सातारा प्रतिनिधी । परतीच्या पावसाचा अनेक निसर्ग पर्यटनस्थळांना फटका बसलेला आहे. दरम्यान, सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याच्या पर्यटनाला पावसामुळे रेड सिग्नल लागला आहे. १५ ऑक्टोबरला सुरू होणारे वासोटा पर्यटन या वर्षी प्रतिकूल निसर्गामुळे लांबणार आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वासोटा किल्ला आहे. प्रचंड घनदाट जंगल, सूर्यकिरणांनाही प्रवेश मिळणार नाही, अशी उंचच उंच झाडे, वेली आणि झुडपांनी व्यापलेल्या या निसर्गसंपन्न परिसरात वासोटा किल्ला ट्रेकिंगसाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. हा किल्ला कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडील भागात अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेला असल्याने फक्त बोटीच्या साहाय्यानेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वासोटा किल्ला आहे.
प्रचंड घनदाट जंगल, सूर्यकिरणांनाही प्रवेश मिळणार नाही, अशी उंचच उंच झाडे, वेली आणि झुडपांनी व्यापलेल्या या निसर्गसंपन्न परिसरात वासोटा किल्ला ट्रेकिंगसाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. हा किल्ला कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडील भागात अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेला असल्याने फक्त बोटीच्या साहाय्यानेच • तिथे जाता येते.
या किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली, मुनावळे, शेंबडी व तापोळा या ठिकाणी असलेल्या बोट क्लबच्या माध्यमातून बोटी पुरवल्या जातात. वन्यजीव विभाग, बामणोली यांच्या वतीने येथील व्यवस्थापन पाहण्यात येते. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पडणारा पाऊस मान्सूनने माघार घेतली असली तरी रोजच सातत्याने पडत आहे. या पडणाऱ्या पावसाने वासोटा किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग निसरडा आणि धोकादायक आहे. त्यातच जंगलातील पालापाचोळा कुजून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपिपासू जळवांचा सुळसुळाट अजूनही मोठ्या प्रमाणात आहे.