ई-केवायसी करा, अन्यथा रेशनकार्ड रद्द; 31 ऑक्टोबर अंतिम मुदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना रेशनधान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य, तसेच रेशनकार्ड १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’चे बंधन घातले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने

यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधापत्रिकाधारकांने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी , प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर त्यांना रेशनधान्य मिळणार नाही.

याशिवाय आशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून, त्या शिधापत्रिकादेखील रद्द केल्या जाणार आहेत. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभाथ्यनि आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.