सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटनाची अनेक ठिकाणी आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना अशी एकाहून एक पर्यटन केंद्र असणाऱ्या या जिल्ह्यात आता पर्यटनाचा वेगळा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. तो म्हणजे गोड्या पाण्यातील जल पर्यटनाचा होय. गोड्या पाण्यातील देशातील पहिले जलपर्यटन जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे आजपासून सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचे आज लाकार्पण करण्यात आले आहे.
कोयना धरणातील शिवसागर जलाशयात जावळी तालुक्यातील मुवाळे येथे जलपर्यटनाच्या प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या पर्यटन प्रकल्पाचे महत्व म्हणजे हे गोड्या पाण्यातील देशातला पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. या ठिकाणी जिल्हावासीयांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना देखील जल पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
विषे म्हणजे या प्रकल्पामुळं स्थानिक तरुणांना रोजगार तयार होणार असुन कामासाठी शहरात गेलेला स्थानिक माणुस या प्रकल्पामुळं परत येण्यास मदत होणार आहे. खास करून महाबळेश्वर मध्ये येणा-या पर्यटकांना आता याचा दुहेरी लाभ होणार आहे. कारण महाबळेश्वरपासून जवळच हा पर्यटन प्रकल्प असून चारचाकी तसेच दुचाकीने देखील याजलपर्यटन प्रकल्पाच्या ठिकाणी जाता येणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दुर्गम गावाला जोडणारा ब्रीज
देशातील पहिलया गोड्या पाण्यातील जलपर्यटन प्रकल्प हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजन्म गाव असलेल्या तालुक्यात येतो. त्यांच्या दरे या दुर्गम गावाला जोडणारा ब्रीज देखील बांधला जात आहे. दरेगाव आणि कांदाटी खो-याला जोडणारा हा पूल असणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा पुल बांधला जाणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिरे असा केबल स्टेड पुल असणार आहे.
नदी जलाशयावर होणारा हा पहिला प्रकल्प
प्रकल्पास ४५.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामुळे पर्यटन वाढ होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. जलपर्यटन आणि जलक्रीडा यांचा समावेश असलेला आणि नदी जलाशयावर होणारा अशाप्रकारचा हा पहिला प्रकल्प ठरला आहे.