इंदोलीतील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ‘संविधान बचाव कार्यशाळा’ उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथील कै. रामराव निकम बी.एड. महाविद्यालयातील व्दितीय वर्ष ‘यशवंत गट’ कराड गटाच्या छात्राध्यापकांच्यावतीने नुकतेच संविधान बचाव कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कापील गोळेश्वर येथील जवाहर विद्यामंदिर विद्यालयात कार्यशाळेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला.

यावेळी कै.रामराव निकम शिक्षण शास्त्र बी. एड कॉलेज इंदोलीचे प्राचार्य. एस. ए. पाटील आणि नृसिंह शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन निवासराव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यशाळेच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून दिपाली निवास यांनी उपस्थिती लावली. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र मोरे, शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचे सर्व विद्यार्थी व छात्राध्यापक या कार्यशाळा उपक्रमास उपस्थित होते.

यावेळी या कार्यशाळेत एकूण भारताचे संविधान काय आहे? संविधानाची मूल्ये कोणती आहेत? ती आपण विद्यार्थी दशेपासून कशी जोपासावीत? सर्व मूल्यांची जपणूक, जोपासना समानतेतून आणि सर्वधर्मसमभावातून कशी जपावीत? आपल्या घरापासून समाजात व समाजापासून आपले राज्य, देशापर्यंत ती अमलात आणावीत याबद्दल या कार्यशाळेचा प्रमुख पाहुण्या दिपाली आशा निवास मॅडम (संवेदना फेलो) यांनी अत्यंत सोप्या सरळ समजेल अशा शब्दात उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले.

संविधानाची सर्व मूल्ये आपण आपल्या शाळेतील शिस्त, नियम कायदे पाळून त्यांची रुजवणूक आपल्या कुटुंबातील घटकापासून अमलात कशी आणावीत त्यातून देशासाठीची मूल्ये अमलात आणण्यासारखे आहे, असे प्रतिपादन या कार्यशाळेचे अध्यक्ष ए .आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

कै.रामराव निकम शिक्षण शास्त्र बी. एड कॉलेज इंदोलीचे प्राचार्य. एस. ए. पाटील आणि नृसिंह शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन निवासराव निकम यांनी अनमोल मार्गदर्शन केले. ‘यशवंत गट कराडच्या मार्गदर्शिका प्रा. सौ. के.के थोरात, प्रा. सौ. एस. एम बोर्ड यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक छात्राध्यापिका शिवानी बैले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्नेहल चव्हाण यांनी केला. तर कार्यशाळेच्या उपक्रमाचे आभाराचे काम सफिया शेख यांनी केले. ‘वंदे मातरम ‘गीताने कार्यशाळेची सांगता झाली.