कराड आगारातील ST बस चालकास दोघांकडून मारहाण; मारहाणीत चालक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड आगारातील एसटी बस चालकास दोघांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज कराड तालुक्यातील निगडी गावच्या हद्दीत चिखली फाटा येथे घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या बस चालकास कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड आगारातून निगडी येथे एसटी बस चालक अविनाश निकम एसटी बस घेऊन निघाले होते. यावेळी दुचाकीवरून महिला निघाल्या होत्या. त्या बसच्या बाजूने जात असताना अचानक त्यांची दुचाकी घसरून त्या खाली पडल्या. यावेळी संबंधित प्रकार मारहाण झालेल्या एसटी बस चालकाने पाहिला. मात्र, घाई गडबडीत ते बस घेऊन निघून गेले. यात्रा जेव्हा परत माघारी येत असताना त्या रस्त्यावरदोन युवकांनी बस थांबवली. त्यांनी बसचा दरवाजा उघडून बसमध्ये प्रवेश करून बसचालकास मारहाण करण्यास सुरुवात केली. कालांतराने संबंधित चालकास बसमधून खाली उतरवून मारहाण करण्यात आली.

अचानक घडलेल्या घटनेमुळे गावचे सरपंच तसेच इतर ग्रामस्थही गोळा झाले. यावेळी काही ग्रामस्थांनी व एसटी वाहकांनी संबंधित मारहाणीत जखमी झालेले चालक अविनाश निकम यांना कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी एसटी बसचालकावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. अशा प्रकारच्या घटना भविष्यकाळात घडू नये यासाठी एसटी आगार तसेच पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.