सातारा प्रतिनिधी । सर्वसामान्य नागरिकांच्या भ्रष्टाचाराविषयी सातारा शहरासह सर्व तालुक्यातील संबंधित लोकसेवकांच्या (सरकारी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी) तक्रारी ऐकण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक तालुक्यात पोहोचणार आहे. यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दि. १० ते दि. २३ ऑक्टोबर या कालावधीत सर्वच तालुक्यातील शासकीय विश्रामगृहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दिवसभर उपस्थित राहणार आहेत. दि. १० रोजी मेढा (जावली), दि. ११ रोजी महाबळेश्वर, दि. १४ रोजी वाई, दि. १५ रोजी कराड, दि. १६ रोजी खंडाळा, दि. १७ रोजी पाटण, दि. १८ रोजी कोरेगाव,
दि. २१ रोजी फलटण, दि. २२ रोजी दहिवडी (माण) व दि. २३ रोजी वडूज (खटाव) येथे सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जाणार आहेत. वरील सर्व शासकीय विश्रामगृह येथे हा जनता दरबार भरवला जाणार आहे. यासाठी शासकीय कार्यालयात प्रलंबित असलेल्या कामांबद्दलची तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टारासंबंधी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.