कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुरवण्यात येणाऱ्या मतदान यंत्र साहित्य वाटपाचे काम आज सुरु झाले आहे. या दोन्ही मतदार संघातील स्ट्रॉगरूम/ मतदान पेट्या मुख्य केंद्र परिसर मार्गात निवडणूक कर्मचारी, मतदान अधिकार, मतदान पेट्या, यंत्र, साहित्य यांच्या वाहतुकीत अडथळा होऊ नये या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने २६० कराड दक्षिण मतदार संघाच्या मतपेट्या व साहित्य रत्नागिरी गोडावुन,मार्केटयार्ड येथे तर २५९ कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या मतपेट्या व साहित्य स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी वाटप केले जात आहे. तसेच उद्या दि २० रोजी सायं. १८.०० नंतर त्याच ठिकाणी मतपेट्या जमा करण्यात येणार आहेत. सदर दोन्ही ठिकाणी व परिसरात रस्त्यावर मतपेटी नेणेसाठी व मतपेटी जमा करणेसाठी एसटी बस व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी कराड शहरातील अंतर्गत वाहतुक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशमन वाहने, पोलीस दलाची वाहने व निवडणुक प्रक्रियेतील वाहने वगळून इत्तर सर्व वाहनांच्या मार्गात वरील प्रमाणे बदल करणे आवश्यक आहे. तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे २६०- कराड दक्षिण मतदार संघ व २५९- कराड उत्तर मतदार संघ मतपेटी व साहीत्य वाटप अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे कराड शहरातील अंतर्गत तात्पुरते बदल करण्यात येत आहे
कराड दक्षिणमधील मतपेटी वाटप व जमा केंद्र परिसरात असा वाहतूक मार्ग बदल
१) एस.टी. टी. पॉईन्ट येथुन भेदा चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत येवुन, सदरची वाहने विजय दिवस चौक येथुन दत्त चौक, पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापुर नाका बाजु कडून जातील.
२) कार्वेनाका बाजुकडुन भेदा चौक बाजुकडे येणारे सर्व वाहनांना गेट नं. ४ येथुन भेदा चौक बाजुकडे प्रवेश बंद करणेत येवुन, सदरची वाहने गेट नं.४ येथुन बैलबाजार रोड, मलकापुर मार्गे हायवे रोडने कराड शहरात जातील.
३) पोपटभाई पेट्रोल पंप येथुन भेदा चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना (मतदान प्रक्रियेतील वाहने वगळून) प्रवेश बंद करणे आवश्यक असुन, सदरची वाहने शाहु चौक, दत्त चौक मार्गे कराड शहरात व सैदापुर कॅनॉल बाजुकडे व कार्वेनाका, कार्वे, शेणोली बाजुकडे जाणारी सर्व वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर बैल बाजार रोडने कार्वे, शेणोली बाजुकडे जातील.
४) वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांचे निवासस्थान येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असुन, सदरची वाहने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर यांचे निवासस्थाना पासुन प्रांत कार्यालय, शाहू चौक मार्ग पोपटभाई पेट्रोल पंप व कोल्हापुर नाका बाजु कडून जातील.
५) अंबिका मेस येथुन भेदा चौक किंवा प्रांत कार्यालयाकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद असुन, सदरची वाहने कराड शहर पोलीस स्टेशन मार्ग शाहू चौक व एस.टी. स्टॅन्ड बाजु कडून जातील
६) कराड शहरातुन कार्वे नाका, कार्वे शेणोली बाजुकडे जाणारी सर्व वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर, बैल बाजार रोडने कार्वे, शेणोली बाजु कडून जातील
७) गेट नं. १ ते बैलबाजार रोड व भेदा चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जाणारा संपुर्ण रोड मतपेटी नेणारे एस.टी. बस व मतदान प्रक्रियेतील वाहनांचे पार्किंग करीता आरक्षित करुन, सदर रोडवर खाजगी वाहने पार्किंग करणेस मनाई असेल.
कराड उत्तर मधील मतपेटी वाटप व जमा केंद्र परिसरात असा वाहतूक मार्ग बदल
१) महालक्ष्मी चौक, कराड येथुन मुंबई आईस्क्रीम चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद असुन, सदरची वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर बैल बाजार रोडने जातील.
२) बैलबाजार रोड, कराड येथुन महालक्ष्मी चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना मुंबई आईस्क्रीम चौक येथुन प्रवेश बंद असुन, सदरची वाहने बैलबाजार रोड, मलकापुर हायवे रोडने कराड शहरात जातील
३) सुपर मार्केट, कराड येथुन गणेश हॉस्पीटलकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे.
४) मोहीते हॉस्पीटल, कराड येथुन स्व. यंशवतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, कराड़ बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश आहे.
५) एस.टी. टी. पॉईन्ट येथुन भेदा चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत आलेला असुन, सदरची वाहने विजय दिवस चौक मार्गे दत्त चौक, पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापुर नाका बाजुकडे जातील.
६) कार्वेनाका बाजुकडुन भेदा चौक बाजुकडे येणारी वाहनांना भेदा चौक येथुन प्रांत कार्यालयाकडे जाणारे वाहनांना प्रवेश बंद करणेत आलेला असुन, सदरची वाहने भेदा चौक येथुन पोपटभाई पेट्रोल पप बाजुकडे जातील.
७) मुंबई आईस्क्रीम ते स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथील संपुर्ण रोड, झेंडा चौक ते गणेश हॉस्पीटल जाणारा, संपूर्ण रोड व पी.डी. पाटील उद्यान समोरील कॉलनीतील रोड मतपेटी नेणारे एस.टी. बस व मतदान प्रक्रियेतील वाहनांचे पार्कीग करीता आरक्षित करुन, सदर रोडवर खाजगी वाहने पार्कीग करणेस मनाई आहे.
८) गेट नं. १ ते बैलबाजार रोड व भेदा चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील संपुर्ण रोड मतपेटी नेणारे एस.टी. बस व मतदान प्रक्रियेतील वाहनांचे पार्कीग करीता आरक्षित करणेत आलेला आहे