कराडात गणपती विसर्जन निमित्त वाहतूक मार्गात तात्पुरता बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहरामध्ये गणपती विसर्जन हे विविध सार्वजनिक गणेश मंडळाकडुन केले जाते. विसर्जन पाहण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातुन अबाल वृध्दांची तसेच वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन तसेच वाहतुकीची कोंडी होवु नये याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. या पार्श्वभूमीवर दिनांक १७/०९/२०२४ व १८/०९/२०२४ रोजी कराड शहरामध्ये बदल करण्यात येत आहे.

१) कृष्णा नाका, कराड बाजुकडुन कराड शहरात व सोमवार पेठ मार्गे कृष्णा घाट, कराड कडे जाणारी वाहतुक ही कृष्णा नाका जोतीबा मंदीर-कमानी मारुती मंदीर-सोमवार पेठ- पाण्याची टाकी- जनकल्याण बँक या मार्गे जातील. तसेच सोमवार पेठ, कराड येथील नागरिकांना कराड शहरातुन बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा.

२) कोल्हापुर नाका बाजुकडुन कराड शहरात येणारी व कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतुक ही दत्त चौक- आझाद चौक सात शहीद चौक शुक्रवार पेठ बालाजी मंदीर या मार्गावरुन जातील. तसेच शुक्रवार पेठ, कराड व बालाजी मंदीर परिसर येथील नागरिकांना कराड शहरातुन बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा.

३) दत्त चौक- यशवंत हायस्कुल- आझाद चौक- नेहरु चौक चावडी चौक- बालाजी मंदीर- झेंडा चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी,चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्कीग करण्यास मनाई करणेत येत आहे.

४) कृष्णा नाका जोतीबा मंदरी- कमानी मारुती मंदीर चावडी चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्कीग करण्यास मनाई करणेत येत आहे.

५) दत्त चौक-यशवंत हायस्कुल- आझाद चौक- नहेरु चौक-चावडी चौक- बालाजी मंदीर मार्गे कृष्णा घाट जाणारे मिरवणुक मार्गात काही अडथळा आलेस सदर मिरवणुकी करीता कर्मवीर पुतळा – पायल फुटवेअर-अंडी चौक ते पाण्याची टाकी, रविवार पेठ- ते नेहरु चौक, हा पर्यायी रस्ता ठेवण्यात आलेने, सदर रस्त्यावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्कीग करण्यास मनाई करणे आवश्यक आहे. ६) दत्त चौकाकडे येणा-या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करणेत येत आहे.