सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्टाफ रूममध्ये बोलावून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एका शिक्षकावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १६ रोजी सातारा तालुक्यातील एका गावातील शाळेत घडल्याने शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीला संबंधित शिक्षकाने स्टाफ रूममध्ये बोलावले. तिच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार वारंवार घडत असल्याने मुलीने याची माहिती पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन दि. २४ रोजी तक्रार दाखल केली.
संबंधित शिक्षकाला अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेत जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. महिला पोलिस हवालदार येवले या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.