खोडशी नजिक महामार्गालगत थांबलेल्या फॉर्च्यूनर कारला टाटा नेक्सनची जोराची धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर खोडशी गावनजीक थांबलेल्या फॉर्च्यूनर कारला पाठीमागून टाटा नेक्सनने जोराची धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात कारमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर खोडशी नजीक फॉर्च्यूनर कार थांबली होती. यावेळी अचानक त्या ठिकाणी पाठीमागून टाटा नेक्सन आली. यावेळी नेक्सनने कारला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार महामार्गावरून बाजूला असलेल्या सेवा रस्त्यावर जाऊन आदळली. अचानक झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी इतर लोकांनी गर्दी केली. तर काहींनी या अपघाताची माहिती महामार्ग देखभाल विभाग व पोलिसांनी दिली. माहिती मिळताच डीपी जैन कंपनीचे अधिकारी दस्तगीर आगा यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

कदम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच अपघातातील लोकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत केले जात होते.