मुख्यमंत्री शिंदेंच्या गावाकडे जाणारी शिवसागर जलाशयातील तराफा सेवा झाली बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद व पर्यटन विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसागर जलाशयातून तापोळासह परिसरातील गावांना तराफा, लॉन्च सेवा पुरवली जात आहे. दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेल्या तराफा (बार्ज) व लाँच सेवा जलाशयातील पाणीपातळी कमालीची घटल्याने बंद करण्यात आली आहे. शिवसागर भरल्यानंतरच ही सेवा पूर्ववत असल्याने या 3 भागातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोयना भागातील शिवसागर जलाशय किनारी वसलेल्या गावातील लोकांच्या दळणवळणाचे मुख्य साधन हि तराफा आणि लॉन्च सेवा आहे. तापोळा व केळघर, सोळशी अशा तीन गावांतीळ ग्रामस्थांना दळणवळनासाठी हि सेवा सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहनांसह छोटी-मोठी वाहने तराफ्यातून अलीकडे पलीकडे नेली जातात. तसेच कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना तापोळा बाजारपेठेशी जोडणारी लाँच अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी तर कोयना भागातील काही गावांसाठी सेवा लाँच सुरू असते. मात्र, कोयना धरण शिवसागर – जलाशयाची पाणी पातळी पूर्णपणे खालावली असल्याने तराफा सेवेसह लाँच सेवाही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.