गुजरातचे गुन्हेगार तळबीड पोलिसांच्या जाळ्यात; कराडच्या तासवडे टोलनाक्यावर 5 संशयित जेरबंद

0
6

कराड प्रतिनिधी | शनिवारी दिल्लीहून गोवा येथे आलेले गुजरातमध्ये गंभीर गुन्ह्यात सामील असलेले पाच संशयित तळबीड पोलिसांनी कराडच्या तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करून जेरबंद केले. ही कारवाई रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाली.

गुजरातमधील वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉलमध्ये झालेल्या वादावादीत दहा ते बारा संशयितांनी तलवारी नाचवत खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे ते फरार झाले होते. या प्रकरणातील पाच संशयितांना तळबीड पोलिसांनी पकडले आहे. या संशयितांची नावे मिहीर बलदेव देसाई (वय 22), प्रिन्स बजरंगलाल जागीर (23), पवन कनुबाई ठाकूर (25), कैलास कमुरचंदजी दरजी (34) आणि जिग्नेशभाई अमृतबाही रबारी (26) असे आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार, हे संशयित कोल्हापूरहून मुंबईकडे जाणार होते. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांना नाकाबंदी करण्याची सूचना दिली, ज्यानुसार तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करून ट्रॅव्हल्स तपासण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या पथकाने या संशयितांना ताब्यात घेतले आणि गुजरात पोलिसांच्या हवाली केले.

या कारवाईत जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त पोलीस प्रमुख वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंद रजपूत, दिनकर काळे, पोलीस हवालदार योगेश भोसले, शहाजी पाटील, आप्पा ओबांसे, सनी दीक्षित, अभय मोरे, निलेश विभुते आणि महिला पोलीस अंमलदार शितल मोहिते, अश्विनी थोरवडे यांचा समावेश होता.