सातारा प्रतिनिधी । सातारा शहर पोलिसांच्यावतीने सातारा शहरातील काही कॅफेवर अचानक धडक कारवाईची मोहीम राबविली. यावेळी तीन कॅफेमध्ये छापा टाकण्यात आला असता त्यामध्ये अश्लील कृत्य, रजिस्टरमध्ये नोंद न ठेवणे,असे प्रकार आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
यश किरण निकम (रा. शिवथर, ता. सातारा), जयदीप नलवडे (पूर्ण नाव नाही, रा. वाढे, ता. सातारा), वैभव जोतीराम साळुंखे (रा. कामाठीपुरा, सातारा), संग्राम हरिचंद्र दणाणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) तसेच गणेश सतीश जाधव (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), मानतेश मारुती जानी (रा. कोयना सोसायटी, सातारा) यांच्यासह इतर तीन महिला ( नाव नाही) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्यावतीनेबुधवारी सायंकाळनंतर शहरातील तीन कॅफेमध्ये छापा टाकण्यात आला. यामध्ये सेव्हन स्टार काॅम्प्लेक्स याठिकाणच्या दोन तर विसावा नाका परिसरातील एका कॅफेचा समावेश होता. या ठिकाणी छापा टाकत केलेल्या कारवाई प्रकरणी शहर ठाण्यातील पोलिसांनी तक्रार देखील दाखल केली.
पोलिसांनी ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी कॅफेमध्ये पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेपासून दूर ठेवणे, दरवाजे अपारदर्श ठेवून अंधार करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची क्तीं नोंदणी रजिस्टरमध्ये न करणे, सार्वजनिक कॅफेमध्ये अश्लील कृत्य करण्यास अप्रेरणा देणे याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक माहिती घेत आहेत.