पशुपालकांच्या उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेची पंचसुत्री; पशुवैद्यकीय अधिकारी गावोगावी जाऊन देणार सेवा

Satara News 2

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने दरवर्षी एक वासरू जन्माला येणे, दुग्ध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थापासून उत्पन्नात वाढ करण्यासाठी पंचसूत्री राबविण्यावर भर दिला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कार्यक्षेत्रातील गावांत जाऊन सेवा देण्यासाठी सूचना केलेली असल्यामुळे शेतकऱ्यांनाही गतिमान सेवा मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या जिल्हास्तरीय १७१ आणि राज्यस्तर २२ असे एकूण १९३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या … Read more

मतदार जनजागृतीसाठी फलटणमध्ये मानवी साखळीमधून साकारला महाराष्ट्राचा नकाशा

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 1 हजार विध्यार्थी, युवक व मतदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फलटण 100 टक्के मतदान रांगोळीच्या व मानवी साखळी द्वारे करण्यात आले तसेच मानवी साखळी द्वारे जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. फलटण येथील … Read more

लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणीच्याच खात्यात जमा : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

satara News 2024 10 12T201023.117

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यामध्ये २८ जुन २०२४ पासून सुरु आहे. या योजनेदरम्यान, चालु महिन्यात दि. ९ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हयातील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांचे मोबाईल क्रमांकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अनुदान जमा झाल्याचा मेसेज आला. याप्रकरणी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून माहिती घेतली असून हा … Read more

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात चांगले काम : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 31

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 5 लाख 20 हजार 560 ऑनलाईन अर्ज भरले गेले आहेत. त्यापैकी 4 लाख 42 हजार 887 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याने या योजनेत चांगले काम केले असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. या … Read more

जावळी तालुक्यात साथरोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत महास्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 20240729 155200 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी साठल्याने त्याठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे. आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच प्लास्टिक कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. साथरोग नियंत्रणासाठी महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या … Read more

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या; एम. व्यंकटेशन यांचे प्रशासनास निर्देश

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीबाबत साताऱ्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात. त्याचबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश एम. व्यंकटेशन यांनी प्रशासनास दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील … Read more

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणीचा दोन लाखांचा टप्पा पार

Satara News 76

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 2 हजार 131 महिलांचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी हा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार … Read more

जिह्यातील 36 प्राथमिक शिक्षकांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । गेल्या 10 वर्षांपासून सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मुहूर्त मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या 36 प्राथमिक शिक्षकांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. या शिक्षकांना जाग्यावरच नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रियेसाठी जिह्यातील 54 प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी 14 शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारण्यास … Read more

‘माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी याशनी नागराजन यांच्याकडून मार्गदर्शक सुचना जारी

Satara News 45

सातारा प्रतिनिधी । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सातारा जिल्ह्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कुटुबातील त्यांची भुमिका मजबुत करण्यासाठी ही योजना शासनामामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला यांच्या कडून विहीत कालमर्यादेत अर्ज प्राप्त करून सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दीड … Read more

ठराव समितीची बैठक उत्साहात; याशनी नागराजन यांच्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240703 131437 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठराव समितीची सभा पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुका नजिकच्या काळात होणार असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या. ठराव समितीच्या सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण … Read more

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाला दिली भेट

Satara News 20240630 155513 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नेत्रतपासणी शिबीरानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नेत्र विभागाला भेट दिली. तसेच विभागाची पाहणी केल्यानंतर तेथील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दिनांक २९ मे २०२४ रोजी केडंबे तालुका जावली या डोंगराळ भागामध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन … Read more

महा-अवास योजना अभियान ग्रामीण 2.00 अंतर्गत जिल्ह्याला विभागीय स्तरावरील 16 पुरस्कार प्रदान

Satara News 33 1

सातारा प्रतिनिधी । सन 2022-23 या आर्थिक वर्षात महा-अवास अभियान ग्रामीण 2.00 राबविण्यात आले. यामध्ये विविध वर्गवारीत विभागस्तरावरील 28 पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून त्यातील 16 पुरस्कार सातारा जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. या पुरस्काराचे सन्मानार्थींना आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. घरकुल पात्र परंतु … Read more