छत्रपतींचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल : खा. श्रीनिवास पाटील

Satara News 81 jpg

कराड प्रतिनिधी | छत्रपती शिवरायांचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल. त्यानंतर महिलांना आपोआपच सन्मान मिळेल. स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केल्यास ‘ती’ उंच भरारी घेण्यास सज्ज होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या कर्तृत्वामुळे माझ्या लेकीबाळींना लोकमान्यता मिळावी, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. … Read more

विटांनी भरलेली ट्रॉली अंगावरुन गेल्यान ‘त्याच्या’ डोळ्यादेखत ‘तिचा’ झाला मृत्यू

Crime News 20240121 055228 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिंगणापूर-दहिवडी घाट महामार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ विटांनी भरलेली ट्रॉली महिलेच्या अंगावरुन गेल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. रंजना वाघमारे (मूळ रा. नांदेड, सद्या रा. मांडवे, ता. माळशिरस) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मांडवे (ता. माळशिरस) या ठिकाणाहून विटांनी भरलेल्या दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर (क्र.एमएच ११ यु … Read more

खंडित वीज पुरवठ्यामुळे ‘या’ गावातील महिला ग्रामस्थाकडून अधिकार परिषदेतर्फे मागणी

Satara News 20240114 151523 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील पांढरवाडी येथील खरात वस्तीवर सतत खंडित वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले असून, वीजपुरवठा नियमित करावा, अशा मागणीचे निवेदन महिला अधिकार परिषदेच्या वतीने दहिवडीच्या वीज वितरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता कदम यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, खरात वस्ती येथे २० ते २५ कुटुंब असून, सगळ्यांनी घरामध्ये … Read more

‘उमेद’ने सोडवला ‘फायनान्स’चा विळखा; संकल्प यात्रेत एकाच दिवसात 11 कोटी वाटप

Satara News 24 jpg

सातारा प्रतिनिधी । वंचित घटकांना मुख्य प्रावाहात आणण्याबरोबर मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अनेक गरीब गरजू कुटुंबे अडकली आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानानने बचत गटाच्या माध्यमातून मोठा आधार देण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षात उमेद परिवारातील २ लाख पेक्षा जास्त कुटुंबांना सातशे आठ कोटी अर्थसहाय्य अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. आज एका दिवसात विकसित … Read more

मराठा आरक्षणासाठी रणरागिणींचा एल्गार, साताऱ्यातील साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी शुक्रवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढून साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी देण्यात आलेल्या ‘एक मराठा..लाख मराठा’ या घोषणेने शहर दणाणून गेले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू केलेले … Read more

नांदगावच्या सिंधू मोदक महोत्सवात 100 हून अधिक महिला स्पर्धकांचा सहभाग

Nandgaon Modak Mahotsav News jpg

कराड प्रतिनिधी । नांदगाव, ता. कराड येथे गणेशोत्सवानिमित्त मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोदक बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 100 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. त्यात नांदगावच्या पुनम नरेंद्र पाटील यांचा पानमसाला मोदक भारी ठरला. तर ओंडच्या स्वाती जीवन थोरात यांच्या गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक मोदकाला दुसरा क्रमांक मिळाला. मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे … Read more

ST महामंडळाकडून श्रावण सहलीसाठी महिलांसाठी ‘ही’ खास ऑफर

ST Bus News 20230906 171813 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात. तसेच महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, अपंग व्यक्तींसाठी अन्वएक प्रवासाच्या सवलती देण्यात येतात. महिलांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. यानंतर आता एसटी प्रशासनाच्या वतीने खास श्रावणी सहलीसाठी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याअंतर्गत कराड तालुक्यातील महिलांसाठी या श्रावण सहलीसाठी एसटीने सवलतीच्या दरात महिलांसाठी बस … Read more

पुणे – सातारा महामार्गावर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; 3 महिलांवर गुन्हा दाखल

Crime News 20230904 100929 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात वेश्याव्यवसायाचे प्रमाण वाढले आहे. यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, पुणे – सातारा महामार्ग असलेल्या वेळू ता.भोर, जि.पुणे गावचे हद्दीत सर्विस रोडवर वेश्यागमनास प्रवृत्त करणाऱ्या महिलांवर राजगड पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई केली. यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, वेळू (ता. भोर जिल्हा … Read more

मणिपूरमधील घटनांच्या निषेधार्थ सातारमध्ये उद्या निघणार सहवेदना मोर्चा

Satara City

सातारा प्रतिनिधी । मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या घडलेल्या घटना या मानवी संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सातारा येथे उद्या सोमवार दि. 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता निषेध व सहवेदना मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्याच्या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहवेम अशी मागणी राष्ट्रीयता जागर अभियान यांच्या वतीने करण्यात … Read more

वारीमध्ये कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला तर तातडीक सेवेशी संपर्क साधा : रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Phaltan News

कराड प्रतिनिधी । दरवर्षी पंढरपूरला आषाढी वारीच्या निम्मिताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून दाखल होत असतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय असते. शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलने आवश्यक आहेत. वारीमध्ये अथवा इतर ठिकाणी सुद्धा कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला तसेच कोणताही नराधम हा महिलांना त्रास देत असेल तर त्यांनी तातडीने महिला हेल्प लाईनशी संपर्क साधा, असे आवाहन … Read more