सातारा जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत झाली ‘इतकी’ नोंदणी

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यभरात सुरु करण्यात आली असून सातारा जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी गतीने सुरू आहे. आतापर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी१ लाख १२ हजार ८४ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तींची पुर्तता करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, … Read more

अर्थसंकल्पातील जाहीर शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील महिलांना मिळवून देणार : धैर्यशील कदम

Satara News 20240702 100000 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने अर्थसंकल्पात महिलांसाठी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘अन्नपूर्णा’ इत्यादी योजनांचे लाभ सातारा जिल्ह्यातील महिलांना मिळवून देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. या योजनांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी आणि जनजागरण मोहिमेसाठी पक्षाचे कार्यकर्ते बूथनिहाय उपलब्ध असतील, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. साताऱ्यात … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर नजिक अपघात महिलेचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी

Karad News 20240629 170107 0000

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत रस्त्यावर दुचाकी घसरून खाली पडलेल्या महिलेला 10 चाकी कंटेनर खाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. अर्चना राजाराम पाटील (रा. कुसुर, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून अक्षय उत्तम पाटील असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more

साताऱ्यात ‘महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीत चाकणकरांपुढे महिलांनी मांडल्या तक्रारी

Satara News 22 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी “महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करुन पिडीतांचे जीवन सुखमय होण्यासाठी … Read more

पीडित महिलांच्या तक्रारींचा होणार निपटारा; साताऱ्यात 27 जूनला ‘महिला आयोग आपल्या दारी’चे आयोजन

Satara News 8 1

सातारा प्रतिनिधी । महिलांच्या तक्रारीबाबत स्थानिक पातळीवर आपले म्हणणे मांडण्याकरिता “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमाद्वारे सातारा जिल्हयातील महिलांच्या तक्रारीची स्थानिक स्तरावर सोडवणूक केली जाणार आहे. गुरुवार दि. 27 जून रोजी सकाळी १० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी आयोजित केलेली आहे, अशी माहिती महिला व … Read more

जिल्ह्यातील धनगर समाजातील महिलांना ‘या’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Satara News 68

सातारा प्रतिनिधी | इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत धनगर समाजातील महिलांकरिता एक खास योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेच्या सवलतीस पात्र नवउद्योजक माहिला लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्या मधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जीन मनी’ योजना उपलब्ध करून आली जाणार आहे. या योजनेचा याचा धनगर समाजातील महिलांनी लाभ घ्यावा, असे … Read more

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनी कचरा वेचक महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Satara News 54

सातारा प्रतिनिधी । कचरा वेचकांना हॅन्ड ग्लोव्हज, बूट, मास्क इत्यादी सुविधा मिळाव्यात, जिल्ह्यातील समाज कल्याण खात्याने कचरा व्यवस्था महिलांच्या मुलांना मॅट्रिक वर्ष शिष्यवृत्ती वेळेत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी अवनी संस्था संचलित कचरा वेचक संघटनेच्या वतीने कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेतील महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेच्या … Read more

आर्थिक स्थिरतेशिवाय सामाजिक सबलीकरण अशक्य आहे : लक्ष्मण माने

Satara News 20240429 123151 0000

सातारा प्रतिनिधी | जकातवाडी, ता. सातारा येथे शारदाश्रम, जकातवाडी येथे महिलांना शिलाईकाम व त्यासंदर्भातील इतर उद्योगांचे प्रशिक्षण व रोजगार निर्मिती केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी आर्थिक स्थिरतेशिवय सामाजिक सबलीकरण शक्य नाही, कुटुंबाला सुदृढ करण्यासाठी घरातील स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ राहील पाहिजे व त्यासाठी कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत होणे गरजेचे आहे. जर कुटुंब सक्षम … Read more

‘लेक लाडकी’तून जिल्ह्यातील 1 हजार मुलींच्या खात्यावर 5 हजार निधी जमा

Satara News 20240401 115018 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुलींच्या सक्षमी करणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. ही योजना राबवण्यास सातारा जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 1 हजार मुलींच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. या योजनेमुळे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून … Read more

साताऱ्यात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते महिलांचा सत्कार

Satara News 2024 03 16T124008.156 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील श्री. ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीने नुकताच महिलांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी उपस्थिती लावली होती. “शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व त्या यशस्वी करण्यासाठी महिलांच्या विविध गटांनी सहकार्य करावे. त्यांनी शासकीय योजनांला लाभ घेण्यासाठी पुढे यावे,” अशी अपेक्षा जिल्हा कृषी अधीक्षक फरांदे यांनी यावेळी व्यक्त केली. … Read more

महिला तक्रारदारांपर्यंत पोलीस 10 मिनिटात पोहोचतील अशी यंत्रणा कार्यान्वित करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 8 jpg

पाटण प्रतिनिधी । “पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी दहा मिनिटाच्या आत त्या तक्रारदार महिले पर्यंत पोहोचेल, अशी यंत्रणा पोलीस विभागाने कारणीत करावी,” असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज घेतला. यावेळी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

मान्याचीवाडी गावाने मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : दिग्विजय पाटील

Patan News 3 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मान्याचीवाडी, ता.पाटण येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित मधुमक्षिका पालन विषयावर नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिलांसाठी राज्य शासनाची मधकेंद्र योजना आर्थिक उन्नतीचे साधन ठरेल. शासनाची ही योजना गावागावात चळवळ म्हणून राबविण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण विकासात दिशादर्शक ठरलेली … Read more