वन्य प्राण्यांसोबत रील करून Video शेअर कराल तर कोठडीची हवा खाल !

Karad News 16

कराड प्रतिनिधी । वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ हा पर्यावरण आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे वन्यजीवांचा छळ केल्यास किंवा बंदिस्त ठेवल्यास या कायद्यान्वये तो गुन्हा ठरतो. मात्र, काही जणांकडून ‘ट्रेंडिंग’मध्ये येण्यासाठी तसेच ‘लाइक्स’ आणि ‘शेअर्स’ वाढविण्यासाठी ‘हटके’ रील बनविण्याचा प्रयत्न केला जातो. काही जण त्यासाठी वन्यप्राण्यांच्या रील्स बनवून त्या सोशल मीडियावर प्रसारित करतात. मात्र, कायद्याने तो … Read more

कास परिसरातील डोंगरमाथ्यावर वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस; शेतकरी हतबल

Agriculture News 1

सातारा प्रतिनिधी । वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकऱ्यांकडून भातशेती केली जाते. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागातील जंगली प्राण्यांकडून भातशेतीचे व नाचणीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून त्यांनी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातले आहे. साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या कास परिसरातील … Read more

दहिवडी-नातेपुते मार्गावर अज्ञात वाहनाची बसली तरसाला धडक, पुढं घडलं असं काही…

Satara News 20240119 102220 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दरवर्षी अज्ञात वाहनांच्या धडकेत अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. अशीच एक घटना माण तालुक्यातील दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे घडली. या ठिकाणी तरस हा वन्य प्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे. दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे असणाऱ्या मोठ्या पुलाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तरस मृतावस्थेत आढळून आला. तरसाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला … Read more

फलटण तालुक्यात आढळली अतिदुर्मीळ वाघाटी मांजराची पिल्ले

Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । अत्यंत दुर्मीळ अशा जंगली वाघाटी मांजरींनीपासून दुरावलेल्या ३ पिल्लांची आणि आईची भेट वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्राणिमित्रांनी घडवून आणली. फलटण तालुक्यातील खटके वस्ती (गवळीनगर) येथील आनंदराव खोमणे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजुरांना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) या अतिदुर्मीळ जंगली मांजराची ३ पिल्ले आढळली होती. याबाबतची माहिती खोमणे यांनी फलटण वन … Read more

3 गावठी पिस्टल, 2 गावठी कट्ट्यांसह वाघाची नखे व प्राण्याची शिंगे जप्त; एकास अटक

Wai Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाई तालुक्यातील बावधन येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा … Read more