सातारा शहरात जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती

Satara News 6 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळतीचं ग्रहण लागले आहे. शहराच्या पूर्व भागास पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जल वहिनीला शाहू स्टेडियमजवळ मोठी गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. यानंतर जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने सोमवारी सकाळपासूनच गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सातारा शहराच्या पश्चिम भागाला नगरपालिका तर पूर्व भागाला जीवन … Read more

ध्वजारोहणानंतर पोहण्यासाठी ‘त्या’ दोघांनी पाण्यात टाकल्या उड्या; पुढं घडलं असं काही….

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । 15 ऑगस्टचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम केल्यानंतर सुट्टी असल्याने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोघं मित्रांनी मस्तपैकी पोहण्याचा प्लॅन केला. थोडं खाल्यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बंधाऱ्यावर पोहचले. अंगावरचे कपडे काढून दोघांनी एकामागून एक पाण्यात उड्या टाकल्या आणि दोघांवर काळाने घाला घातला. हि दुर्दैवी घटना सातारा शहरातील जानकर कॉलनी परिसरात घडली. यामध्ये दोघा शाळकरी … Read more

साताऱ्याच्या ऐतिहासिक महादरे तलावावर राहणार CCTV चा वाॅच

Mahadare Lake of Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील ऐतिहासिक महादरे तलावाला आता संरक्षण मिळणार आहे. तसेच येथील पाणीसाठ्यावर देखील लक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेच्या वतीने या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यातील या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि देखभाल दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयाबाबतनागरिकांमधून समाधान व्यक्‍त केले … Read more

ढेबेवाडी खोऱ्यातील वांग-मराठवाडी धरणात जमा झाला ‘इतका’ पाणीसाठा

Wang Marathwadi Dam News jpg

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या माध्यमातून कराड,पाटण, सगळी जिल्ह्यास पाणीपुरवठा होतो. तसेच पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरणाद्वारेही परिसरात शेतीक्षेत्रास पाणी पुरवले जाते. एकूण पाणीसाठवण क्षमता 2.73 टीएमसी असलेल्या वांग मराठवाडी धरण हे आता 73 टक्के … Read more

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट बंद

Koyna Dam 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धरण कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी धरणाच्या पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट आज सकाळी 10 वाजता बंद करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण … Read more

सातारा शहरातील खड्ड्यांत तरंगल्या कागदी होड्या! AAP च्या कार्यकर्त्यांचं अनोख निषेध आंदोलन

Satara Protest AAP Workers News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांकडे पायिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी चक्क खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. … Read more

सातारकरांची चिंता मिटली ! कास तलाव झाला ओव्हरफ्लो…

Kas Lake News

सातारा प्रतिनिधी | गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात पर्यटन वाढावे, या दृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्याप्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे. दरम्यान, सातारा तालुक्यातील ठोसेघर … Read more

फलटणमध्ये २२ गावच्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टरसह काढला मोर्चा; केली ‘हि’ महत्वाची मागणी

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील सुमारे 22 गावातील शेतकरी व नागरिकांनी ट्रॅकटरमधून फलटण येथील जलसंपदा कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी या मोर्चामध्ये महिला व अबाल वृद्ध शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मोर्चातील महिला व शेतकरी यांनी ‘अस्तरीकरण हटाव शेतकरी बचाव’, जल है तो कल है, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर … Read more

पाणी टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या पाच तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरगाव, वाई, कराड या सहा तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या गावात विहीर अधिग्रहण करण्याच्या अधिकाराला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानी … Read more

मोरणा नदीकाठच्या ग्रामस्थांनो सावध रहा…; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Morna River Dam News

कराड प्रतिनिधी । गेल्या चार ते पाच दिवसांत पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिणामी या तालुक्यातील मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मोरणा नदी काठावरील गावातील ग्रामस्थ, नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. मोरणा गुरेघर … Read more

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.5 TMC ने वाढ; प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक पाण्याची आवक

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC ने वाढ झाली आहे. तसेच धरणात प्रतिसेकंद 30 हजार 266 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी 153, नवजामध्ये 124 आणि कोयनानगरमध्ये 98 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पाऊस आणि पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा … Read more

पाणीपट्टी आकारणीबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांचे कराड पालिकेस महत्वाचा आदेश; म्हणाले की…

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दररोज सकाळी व सायंकाळी पाणी पुरवठा १५ मिनिटे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाणीपुरवठा कमी वेळ होत आहे. तसेच पालिकेडून पाणीपट्टी आकारणी मध्ये दरवाढ केली असल्याने याबाबत नागरिकांडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या दरवाढीच्या निर्णयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्पुरती स्थगिती … Read more