जिल्ह्याला रेड अलर्ट; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 20240709 100321 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 31.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर 30.09 टक्के धरण भरले आहे. एक जूनपासून … Read more

साताऱ्यातील ‘या’ भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Satara News 20240702 121642 0000

सातारा प्रतिनिधी | महावितरणच्या शेंद्रे उपकेंद्रात बिघाड झाल्याने मंगळवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शहापूर योजनेचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारच्या सत्रातील यशवंत गार्डन टाकी माध्यमातून पाणीपुरवठा होणार नाही. याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. … Read more

साताऱ्याचा पाणीपुरवठा सोमवार, मंगळवारी राहणार बंद; नेमकं कारण काय?

Satara News 20240511 120059 0000

सातारा प्रतिनिधी | एन उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या राज्यात सर्वत्र भासत असताना सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. सोमवार (दि. १३) व मंगळवारी (दि. १४) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी वेळ लागणार … Read more

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित 2 तालुक्यातील 5 गावे अन् 3 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू

Satara News 2024 03 23T115153.099 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई महसूल उपविभागांतर्गत वाई, खंडाळा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील ४९ आणि खंडाळा २५ अशी तब्बल ७४ गावे टंचाईग्रस्त घोषित असून सध्या वाई तालुक्यातील २ गावे व ३ वाड्या, तर खंडाळा तालुक्यातील ३ गावांमध्ये … Read more

पुलाच्या कामावेळी जलवाहिनी फुटल्याने शाहूपुरीत पाणीपुरवठा झाला ठप्प

Satara News 2024 03 13T151128.409 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सातारा पालिकेच्या वतीने शाहूपुरी चौकालगत असलेल्या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आज सकाळी या कामासाठी खोदकाम केले जाय होते. … Read more

कोयनेच्या आपत्कालीन दरवाजातून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु

Koyna News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । सध्या सांगलीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळीस्थिती वाढलयामुळे कोयना सिंचन विभागाकडे वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालिन दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून सांगलीसाठी ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्यूसेक … Read more

जिल्ह्यातील धरणात पाण्याचा ठणठणाट; ‘इतके’ टक्के आहे पाणीसाठा

Satara News 72 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा लोकाना सोसाव्या लागत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने काही गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक असून जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा कमी … Read more

‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून 927 गावांत नळजोडणी पूर्ण

Satara News 2024 02 28T135452.560 jpg

सातारा प्रतिनिधी । वाढत्या उष्माघातामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणारी एक गोष्ट घडली असून गावोगावो नळजोडणीद्वारे ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील 927 गावांत नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत २०२२-२३ वर्षात 185 कोटी खर्च झाले असून जिल्ह्यातील ही योजना सध्या … Read more

मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाण्याचा सुरु झाला विसर्ग

Marathwadi Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात होती. आता पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत बुधवारपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात पाणी येऊ लागल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा … Read more

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत माण तालुक्यातील ‘या’ गावाचा डंका

Satara News 90 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने अटल भूजल योजना राबविली जाते. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखणे महत्वाचे असते. अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा … Read more

मलकापूर नगरपरिषदेच्या रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा; ‘ते’ शॉप बंद करण्यासाठी रहिवाशांचे निवेदन

Malakapur News jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा डंका वाजवणाऱ्या मलकापूर नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नागरी वस्तीत सुरू असलेल्या एका मोटर वाइंडिंगच्या शॉपच्या वाहनांमुळे पाईप लिकेज होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ते मोटर वाइंडिंगचे शॉप बंद करण्यासाठी शिक्षक कॉलनीतील रहिवाशांनी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे. मलकापूरात राहत असलेल्या स्थानिक … Read more

सातारा शहरात जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती

Satara News 6 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळतीचं ग्रहण लागले आहे. शहराच्या पूर्व भागास पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जल वहिनीला शाहू स्टेडियमजवळ मोठी गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. यानंतर जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने सोमवारी सकाळपासूनच गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सातारा शहराच्या पश्चिम भागाला नगरपालिका तर पूर्व भागाला जीवन … Read more