कास पठारावर टंचाईची तीव्रता वाढली; कुमुदिनी तलाव लागला आटू

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील एक जागतिक वारसास्थळ असलेल्या आणि पुष्प सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारे कास पुष्प पठार उन्हाच्या झळांनी चांगलेच भाजून निघत आहे. या तलावाचा मुकुटमणी असलेल्या कुमुदिनी तलावाने तळ गाठला असून लवकरच हा तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची ओळख आहे. या कास पठारापासून राजमार्गावरील तीन … Read more

कोयना धरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा सांगलीकरांनी आंदोलन करून केला निषेध

Sangali News jpg

सातारा प्रतिनिधी । कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सध्या सांगलीचे पाणी रोखत आहेत, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची टीका देखील आंदोलकांनी केली. सांगली येथील नागरिक … Read more

टेंभू सुधारित योजनेमुळे 41 हजार 003 हेक्टर क्षेत्राला पाणी; सातारासह ‘या’ जिल्ह्यातील गावांना होणार फायदा

Tembu Revised Scheme News jpg

सातारा प्रतिनिधी । आशिया खंडातील सर्वात पहिली जलउपसा सिंचन योजना टेंभू उपसा सिंचन योजना हा प्रकल्प 1996 साली सुरू झाला. महत्वकांशी असलेल्या या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ७ हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाकडून हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र … Read more

कोयनेच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट बंद; ‘इतका’ TMC पाणीसाठा राहिला शिल्लक

Koyana dam rain

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर पिण्याच्या पाणी योजना अवंलबून आहेत. तसेच सिंचनाच्या तीन मोठ्या योजनांनाही पाणी पुरविले जाते. तर वीजनिर्मितीसाठीही पाण्याचा कोटा राखीव असतो. मात्र, यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रातच पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमेतेने भरलेच नाही. तर ९४ टीएमसीवरच धरणातील पाणीसाठा गेला … Read more

कोयना धरणात सध्या ‘इतका’ TMC साठा; वीज निर्मितीला फटका!

Patan Koyna News 20231006 095045 0000 1 jpg

पाटण प्रतिनिधी | महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेत पावसाळ्यात अवघा ९४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात धरण नवव्यांदा भरलेले नाही. त्यातच सध्या धरणात ८५ टीएमसीवर पाणीसाठा आहे. त्यामुळे तरतुदीप्रमाणे सिंचन आणि वीज निर्मितीला पाणी कमी पडणार आहे. कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होत आहे. त्यातील ६७.५ टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी राखीव … Read more

सातारा जिल्ह्यातील तब्बल ‘इतक्या’ महसूल मंडलात दुष्काळ!

Satara Drought News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 8 तालुक्यांतील 65 महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडलांतील दुष्काळग्रस्तांना सर्व सवलती लागू होणार आहेत. राज्य शासनाकडून नुकतीच दुष्काळसदृश तालुक्यांची यादी शासनाने जाहीर केली. मुंंबईत मंत्रालयातील वॉर रूम येथे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभाग व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार … Read more

कोयना धरण 88.38 टक्के भरले; ‘इतका’ TMC जमा झाला पाणीसाठा

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा 93.02 टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता 12 टीएमसीची पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर काेयनेला 31 तर नवजाला 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला … Read more

Satara News : सिंचनासाठी पुन्हा कोयनेतून सांगलीला सोडले पाणी; धरणातून ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी फारच कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पावसाअभावी यंदा कोयना भरले नसलेतरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर धरणात सध्या ९१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे … Read more

सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांत 81 टक्के पाणीसाठा; पहा कोणतं धरण किती भरलं?

Satara Dam News 20230921 233902 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील पाऊस गायब झाल्याने प्रमुख धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. सप्टेंबर महिन्यात धरण भरून पाणी सोडले, मात्र अजूनही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. सिंचनासाठी धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांतून २२५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. … Read more