“रामराजेंनी मला फोन केला, त्यांना भेटीबाबत सांगितलं …”; रामराजेंच्या दांडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Satara News 20241008 091057 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही महिन्यांपासून फलटणमधील महत्त्वाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत आहे. रामराजे नाईक निंबाळकरांनी लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. आता ते अजित पवारांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात शरद पवारांनी इंदापुरात केलेल्या विधानाने चर्चेला बळ दिले. या सगळ्या चर्चांच्या … Read more

तुम्हाला जर पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना सुरु ठेवायची असेल तर…; वाईच्या सभेत अजितदादांचे बहिणींना आवाहन

Ajit Pawar News

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनि आज वाईत जनसन्मान यात्रेतून लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत लाडक्या बहिणींना महत्वाचे आवाहन देखील केले. “माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला पुढची पाच वर्षे तुमची लाडकी भिन्न योजना सुरु ठेवायची असेल तर राष्ट्रवादीचा उमेदवार जिथे उभा असेल तिथे घड्याळाचे … Read more

वाईतील कार्यक्रमाला रामराजेंची दांडी; अजितदादांची वाढली डोकेदुखी

Satara News 2024 10 07T152645.787

सातारा प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास विधान परिषदेचे माजी सभापती तथा अजित पवार गटाचे फलटणचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दांडी मारली आहे. त्यांच्या गैरहजर राहण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. … Read more

अजितदादांचा लाडक्या ‘ताईं’साठी ‘वाई’ दौरा, राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचं लक्ष

Ajit Pawar News 20241007 080338 0000

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार आज वाई विधानसभा मतदार संघात येत आहेत. लाडकी बहीणसह शासनाच्या अन्य लोककल्याणकारी योजनांच्या पार्श्वभूमीवर ते लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी जय्यत तयारी केली आहे. अजितदादांच्या सातारा दौऱ्यात काय घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. लोकसभेच्या निवडणूकी नंतर अजितदादांनी कामाचा, जनसंपर्काचा … Read more

वाईतील प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द; सरकारकडून अधिसूचना जारी

Wai News 20240923 114819 0000

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील वेळेमध्ये औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील तरुणांच्या हाती रोजगार प्रप्त होणार होता. मात्र, शासनाने नुकतीच एक अधिसूचना काढत प्रस्तावित असलेली औद्योगिक वसाहत रद्द केली आहे. यामुळे वाई तालुक्यासह परिसरात तरुणांसह ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबतची अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिद्ध झाली असून, सरकारला या ठिकाणी औद्योगिक वसाहत … Read more

आयटीआय संविधान मंचाचे ऑनलाइनद्वारे वाईत उत्साहात उद्घाटन

Satara News 20240920 145004 0000

सातारा प्रतिनिधी | उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने संविधान मंदिराच्या मंचाचे उद्घाटनाचा कार्यक्रम वाईच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑनलाइन स्वरूपात आभासी पद्धतीने उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. संविधानाची उद्देशिका, संविधानविषयक विविध पुस्तके व कलाकृती आकर्षकपणे एका मंचावर स्थापन करून त्यास संविधान मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. वाईतील संविधान मंचाचे अनावरण … Read more

डॉल्बी, लेझर लाइट लावल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई

Wai News 20240902 090914 0000

सातारा प्रतिनिधी | वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा. डॉल्बी आणि लेझर लाइटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणार्‍या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिला. वाई पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतीच गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक … Read more

ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावरील संतोष पोळ याची हरकत न्यायालयाने फेटाळली

Wai News 20240810 091507 0000

सातारा प्रतिनिधी | अॅड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सत्ताधारी पक्षाकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याशी संबंधित खटल्याचे कामकाज चालविण्यास बंदी घालावी. हा खटला चालवण्यास माझी हरकत असल्याचा धोम वाई खून खटल्याचा मुख्य आरोपी संतोष पोळ याने न्यायालयाला केलेला अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. धोम वाई खून खटल्याची … Read more

धोम, बलकवडी धरणातून सोडलं पाणी; पुराच्या पाण्याचा वाईच्या महागणपतीला चरणस्पर्श

Wai News

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दुपारी धोम धरणातून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराच्या पाण्यामुळं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याने वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे तसेच नदीघाट लगतच्या … Read more

धोम धरणामधून 2600 क्युसेकने विसर्ग; कृष्णेला पूर, महागणपती मंदिर घाट पाण्याखाली

Satara News 20240731 082530 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवारी दुपारी धोम धरणामधून 2 हजार 600 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णेला पूर आला असून, वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला. अनेक मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धोम धरण 84 टक्के भरले आहे. … Read more

धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच; धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Dhom Dam News

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास सांडव्यावरुन २००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत … Read more

वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

Wai Crime News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना अज्ञात चोरटयांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा वाई पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई येथील मुख्य … Read more