बँक घोटाळाप्रकरणी एका संशयितास अटक

20240111 092434 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खंडाळा शाखेचा प्रमुखाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. रणजित शिर्के (रा. यशवंतनगर, वाई) असे पोलिसांनी वाई बसस्थानकातून अटक केलेल्या नाव आहे. त्याला शुक्रवार, दि. 12 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश वाई न्यायालयाने दिला आहे. याबाबत माहिती अशी, वाई तालुक्यातील हरिहरेश्वर बँकेतील आर्थिक … Read more

सर्व विभाग प्रमुखांनी मांढरदेव यात्रेच्या दरम्यान समन्वयाने काम करावे : राजेंद्रकुमार जाधव

Wai News 20240110 161021 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील व राज्याबाहेरील भाविकांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या सातारा जिल्हयातील वाई तालुकेतील मौजे मांढरदेव येथील श्री. क्षेत्र काळेश्वरी देवीची सन 2024 मधील यात्रा दिनांक 24, 25 व 26 जानेवारी,2024 मांढरदेव गड येथे पार पडणार आहे. सदर यात्रेच्या अनुषंगाने येणा-या भाविकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सेवा / सुविधा पुरविन्यात याव्यात, अशा सूचना वाईचे उपविभागीय … Read more

वाईतील जललक्ष्मी योजनेच्या 32 व्हॉल्व्हची चोरी

Wai News 20240109 174642 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्याच्या पश्चिम भागासाठी वरदान ठरलेल्या ‘जललक्ष्मी’ योजनेचे एकूण ३२ व्हॉल्व्ह चोरट्यांकडून लंपास करण्यात आले. याप्रकरणी धोम पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता विक्रम मोकाशी यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जललक्ष्मी योजना बलकवडी धरणावर उभारण्यात आली आहे. या धरणातून बंदिस्त … Read more

मांढरदेव काळूबाई देवीचे मंदिर आजपासून 5 दिवस राहणार बंद?

Satara News 20240107 104116 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळबाई देवीचे मंदिर दि. 7 ते 11 जानेवारी या 5 दिवसांच्या कालावधीत बंद राहणार आहे. याबाबतची माहिती मांढरदेव टस्ट्रकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील मांढरदेव देवस्थान परिसरात गेल्या वर्षभरा पासून अनेक विकास कामे सुरु असून मांढरदेव देवस्थान ट्रस्ट मार्फत … Read more

जिल्ह्यात सापडली तब्बल13 व्या शतकातली गद्धेगळ

Wai News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या इतिहासात भर पडली असून रविवार पेठ येथे १३ व्या शतकातली गद्धेगळ सापडली आहे. वाईला लाभलेला प्राचीन इतिहास त्यात नव्याने उजेडात येत असलेले वाई परिसरातील संशोधन यामुळे वाईच्या इतिहासात नवनवीन अज्ञात असलेले पाने जोडली जात आहेत. त्यात अजून एक पान जोडले जात आहे ते म्हणजे रविवार पेठ येथील परटाचा … Read more

मांढरदेवीची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे; तहसीलदार मेटकरी यांच्या सूचना

Satara News 14 1 jpg

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा येत्या दि. २४ व २५ जानेवारीला होत आहे. या यात्रेसाठी महिनाभर राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली … Read more

3 गावठी पिस्टल, 2 गावठी कट्ट्यांसह वाघाची नखे व प्राण्याची शिंगे जप्त; एकास अटक

Wai Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाई तालुक्यातील बावधन येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा … Read more

Satara News : उडतारे- विरमाडे मार्गावरील सेवा रस्त्यावर ट्रक पलटी; चालक थोडक्यात बचावला

Truck Accident News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतारे ते विरमाडे गावच्या दरम्यान आज बुधवारी सकाळी एक माल ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. सातारा बाजूच्या लेनवरून जात असताना अचानक माल ट्रक पलटी झाला असून यामध्ये ट्रकचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील उडतारे ते वीरमाडे मार्गावरून आज सकाळी … Read more

वाईत 100 वर्षे जुन्या संकुडे वाड्याला भीषण आग

Wai Fire News jpg

सातारा प्रतिनिधी | वाई शहरातील गणपती आळी येथे जुन्या असलेल्या सकुंडे वाड्याला आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांची धावपळ उडाली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाई शहरात असलेल्या गणपती आळी येथे जुना सकुंडे वाडा आहे. या ठिकाणी वाड्याला अचानक आग … Read more

वाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची हॉटेलवर धाड; हॉटेल चालकासह 10 जणांना अटक

Wai Crime News 20231008 081350 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या धनश्री हॉटेल येथे शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अचानक धाडी टाकली. यामध्ये हॉटेल चालकासह 10 जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून टेबले, खुर्च्या, विविध विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6 हजार 585 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर 8 दिवस राहणार बंद; नेमकं काय आहे कारण?

Mandjardevi Tampal News 20230921 105032 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अन् महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मांढरदेव, ता. वाई येथील काळेश्वरी देवीचे मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद राहणार आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून (गुरुवार) २८ सप्टेंबरअखेर बंद ठेवल्याची माहिती मांढरदेव देवस्थानच्या वतीने देण्यात आली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी काळेश्वरी देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन सभा मंडपात सुरू ठेवले … Read more

तब्बल 30 वर्षानंतर ‘त्यांनी’ अंगावर चढवली पोलिसाची वर्दी; असं नेमकं काय घडलं?

Satata Police News 20230916 144442 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेक तरुण आणि तरुणी पोलिस सेवेत दाखल होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पोलिस होऊन अंगावर खाकी वर्दी चढवावी असे वाटत असते. मात्र, पोलिस दलात भरती होऊन अवघी एक वर्षे सेवा केल्यानंतर पुढे 30 वर्षे झाली जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात खाली वर्दी अंगावर न घातलेल्या वाई येथील बळवंत पडसरे यांचे एक वर्षाच्या … Read more