जोशी विहीर येथे कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दोघे जागीच ठार

Crime News 34 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर जोशीविहिर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय ४५, रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धीरज पाटील (वय ३८, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारतच्या सातारा कार्यालयात वितरण विभागात कार्यरत होते. मंदार कोल्हटकर व धीरज पाटील हे आपल्या दुचाकीवरुन रस्त्याच्या … Read more

महाबळेश्वरातील हॉटेल कामगाराचा वाईच्या धोम धरणातील पाण्यात बुडून मृत्यू

Crime News 32 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा वाईच्या धोम धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मनोजकुमार महेंद्र पाल (सध्या रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई सोमवार दि. १५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार महेंद्र पाल … Read more

धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

20240403 043948 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा आसरे (ता. वाई) येथे ही दुर्दैवी घटना घडली. उत्तम सहदेव ढवळे व अभिजीत उत्तम ढवळे अशी त्यांची नावे आहेत. धोम धरणातून भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे. त्यामुळे … Read more

बावधन बगाड यात्रेचा बगाड्या ठरला,’या’ व्यक्तीला मिळाला ‘मान’

Bavadhan Bagad Yatra News jpg

सातारा प्रतिनिधी । साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये भरते. बावधन गावची बगाड यात्रा ही दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरवली जाते. मात्र, याची तयारी ही जवळ जवळ एक ते दीड महिना अगोदरपासून केली जाते. ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात यंदा ३० … Read more

वाई पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत बांबू लागवड केलेल्या शेतीची पाहणी

Farmer News jpg

सातारा प्रतिनिधी । महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाचे माध्यमातून तालुक्यातील लगडवाडी येथील शेतकरी शरद मोरे यांच्या वतीने बांबू लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शरद मोरे यांना मजुरीच्या रूपाने सहा महिन्यांमध्ये ४५ हजार रुपये इतके मजुरी मिळाली. संबंधित शेतकऱ्याच्या बांबू लागवड केलेल्या या ठिकाणची वाई पंचायत समितीची कृषी विभागाचे विस्तार … Read more

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित 2 तालुक्यातील 5 गावे अन् 3 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू

Satara News 2024 03 23T115153.099 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई महसूल उपविभागांतर्गत वाई, खंडाळा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील ४९ आणि खंडाळा २५ अशी तब्बल ७४ गावे टंचाईग्रस्त घोषित असून सध्या वाई तालुक्यातील २ गावे व ३ वाड्या, तर खंडाळा तालुक्यातील ३ गावांमध्ये … Read more

तडीपार केल्याने तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वाई पोलिस ठाण्यासमोर घडली थरारक घटना

Wai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी, शिवीगाळ दमदाटीसारखे सातत्याने गुन्हे करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीवर काल दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्याने चार जणांच्या टोळीतील तिघांनी वाई पोलिस ठाण्यासमोरच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस निरीक्षक जितेंद्र … Read more

चौघांची टोळी 2 वर्षांसाठी तडीपार, जिल्ह्यातील तडीपारांची संख्या पोहचली 90 वर

Wai News jpg

सातारा प्रतिनिधी । वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी, शिवीगाळ दमदाटीसारखे सातत्याने गुन्हे करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आज अखेर जिल्ह्यातील ९० जण तडीपार झाले आहेत. अक्षय गोरख माळी, सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव, सारंग ज्ञानेश्वर माने, आणि वसंत ताराचंद … Read more

वाईत वणव्यामुळे दोन जनावरांचा जागीच मृत्यू

Crime News 20240311 090056 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वाई तालुक्यातील पिराचीवाडी येथे रविवारी दुपारी घडली. यामध्ये एका शेतकऱ्याच्या मृत्यू झालेल्या एक खोंड व एका गायीचा समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यात वणवे लागण्याच्या घटनामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ घडत असल्याची दिसत … Read more

घाटजाईदेवी पालखीसाठी आज आणि उद्या वाहतूक मार्गात बदल

Satara News 2024 03 05T141919.894 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील घाटघाई देवीची आज आणि उद्या यात्रा होत आहे. दरम्यान, पाचगणी बसस्थानक ते घाटजाई मंदिर परिसरात भव्य पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या बुधवार, दि. 6 या कालावधीत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी … Read more

बोपर्डीत भरला बालबाजार; कुणी विकला भाजीपाला तर कुणी वडापाव

Karad News 69 jpg

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील बोपर्डी गावात जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शनिवारी सकाळी ८ वाजता बाल बाजार भरवण्यात आला. यावेळी पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी भाजीपाल्यासह अनेक खाद्य पदार्थांची विक्री करत व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले. गावच्या चावडीच्या मैदानावर भाजीपाला ,कडधान्ये, फळे, मसाल्याचे पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, खाद्य पदार्थ, शैक्षणिक साहित्य आदींचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी लावले होते. सकाळी ८ वाजता … Read more

वाईतील ‘इतक्या’ मधु पालकांना 348 मध पेट्यांसह साहित्याचे वाटप

Satara News 2024 02 26T184300.029 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मुकुल माधव फाउंडेशन (फिनोलेक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने जोर तालुका वाई येथील 58 मधु पालकांना नुकतेच मंडळाच्या मध संचालनालय महाबळेश्वर मार्फत दहा दिवसाचे निवासी मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 48 पुरुष व दहा महिलांचा सहभाग होता. या सर्व प्रशिक्षणार्थींना आज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग … Read more