सातारा जिल्हयाला मिळणार आणखी एक खासदार; नितीनकाका पाटील राज्यसभेसाठी आज अर्ज भरणार

Satara News 20240821 073009 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि राज्यसभेची उमेदवारी नितीन पाटील यांना दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी केलेल्या माहितीनुसार सातारची राज्यसभेची जागा भाजपने त्यानं दिली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, नितीन पाटील … Read more

पुणे-सातारा महामार्गावर बस पेटली; दुचाकीस्वाराचा जळून झाला अक्षरशः कोळसा!

Crime News 20240814 223222 0000

सातारा प्रतिनिधी | पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतर डांबरावर घासत गेली. त्यामुळे स्पार्किंग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाल्याची भीषण दुर्घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाई तालुक्यातील भुईंज येथे घडली. पुण्याहून पलूसकडे एसटी निघाबनली होती. एसटीमध्ये प्रवाशी खचाखच भरले होते. महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एसटी … Read more

‘धोम’च्या डाव्या कालव्यावरील पूल ढासळला; पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतूक केली बंद

Dhom News

सातारा प्रतिनिधी । धोम डाव्या कालव्यावर कवठे केंजळ उपसा सिंचन योजनेलगत खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळल्याची घटना घडली आहे. यावेळी कालव्यातून सुरू असलेले 100 क्युसेक पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला. जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे धोम धरणाच्या डाव्या … Read more

शरद पवार पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल; बैठकीतून सातारा जिल्ह्यासह वाई मतदार संघाचा घेणार आढावा

Satara News 70

सातारा प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्यात आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीसाठी पुण्यातील पक्ष कार्यालयात पवार दाखल झाले असून या बैठकीत सातारा जिल्हयाचा ते आढावा घेणार आहेत. वाई विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील हे अजित … Read more

वाई तालुका वारकरी पायी आळंदी वारीच्या दिंडींस प्रारंभ

Wai News 20240630 170145 0000

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील महागणपती मंदिरासमोर वाई तालुका वारकरी पायी आळंदी वारीच्या दिंडीस प्रारंभ करण्यात आला. वेळी तालुका वारकरी संघटना, कृष्णामाई पंचक्रोशी सोहळा, कमंडलू पंचक्रोशी पायी दिंडी, धौम्य ऋषी पायी वारी, मेरुलिंग दिंडी सोहळा एकत्र करून सर्व दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान झाले. तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप अशोक महाराज पाटणे यांच्या हस्ते विना पूजन करून … Read more

वाई MIDC परिसरात पूर्व वैमस्यातून गोळीबार; एकजण जखमी

Crime News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईच्या एमआयडीसीत पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाला असून गोळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गोळीबाराच्या घटनेत एक युवक जखमी झाला असून त्याला वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दि. २४ रोजी रात्री आठ वाजता … Read more

पसरणी घाटातील 19 बेकायदेशीर होर्डिंगवर कडक कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक

Wai News 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर वाई तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क झाले असून विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पसरणी घाटात बांधकाम विभागाची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक असलेल्या तब्बल 19 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. पसरणी घाट ते पाचगणी पर्यंतचे घाटातील बेकायदा उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंग्स विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक झाले आहे. … Read more

अनोळखी इसमाचा खून करुन ‘त्यांनी’ अपघाताचा केला खोटा बनाव, पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

Crime News 1 2

सातारा प्रतिनिधी । अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० ते ४५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून व त्याला बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना दि. १८ मे रोजी सुरूर ता. वाई येथे घडली होती. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. … Read more

वाईत पालिकेकडून 39 होर्डिंग्ज व 15 मोबाईल टॉवर्सधारकांना नोटिसा

Wai News

सातारा अप्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्य शासनाकडून धोकादायक फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनांना दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण वाई शहरातील पालिका प्रशासनाने चौका-चौकात लावलेले धोकादायक जाहिरातींच्या अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर वाई नगरपरिषदेच्या वतीने नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनधिकृत ३९ होर्डिंग व १५ मोबाईल टॉवर्सनासुद्धा हटविण्याच्या नोटिसा देण्यात आले. … Read more

वाईत ‘डीजे’च्या आवाजाच्या दणक्याने चक्कर येऊन ‘तो’ जागेवरच कोसळला; पुढं घडलं असं काही…

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । पोलीस प्रशासनाकडून मोठ-मोठ्याने कर्णकर्कश करणाऱ्या डीजेंवर कारवाई केली जाते. मात्र, या डीजेच्या ठोक्यांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. अशी घटना वाई येथे घडली आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने वाईमधील तरुणाचा बळी घेतला आहे. या तरुणावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेमंत दिलीप करंजे (वय ३८) असे … Read more

सातारा जिल्ह्यात वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

Wai News 20240422 211452 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास … Read more

चाकूचा धाक दाखवून ‘त्याने’ परप्रांतीय इसमाचे 10 हजार रुपये हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून एकाने परप्रांतीय इसमाकडून 10 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना वाई तालुक्यात घडली होती. या घटने प्रकरणी वाई पोलिसांनी एकास अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, वाई पोलीस ठाणे गु.र.नं ९९/२०२४ … Read more