डॉल्बी, लेझर लाइट लावल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई

Wai News 20240902 090914 0000

सातारा प्रतिनिधी | वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा. डॉल्बी आणि लेझर लाइटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणार्‍या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिला. वाई पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतीच गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक … Read more

ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावरील संतोष पोळ याची हरकत न्यायालयाने फेटाळली

Wai News 20240810 091507 0000

सातारा प्रतिनिधी | अॅड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सत्ताधारी पक्षाकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याशी संबंधित खटल्याचे कामकाज चालविण्यास बंदी घालावी. हा खटला चालवण्यास माझी हरकत असल्याचा धोम वाई खून खटल्याचा मुख्य आरोपी संतोष पोळ याने न्यायालयाला केलेला अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. धोम वाई खून खटल्याची … Read more

धोम, बलकवडी धरणातून सोडलं पाणी; पुराच्या पाण्याचा वाईच्या महागणपतीला चरणस्पर्श

Wai News

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दुपारी धोम धरणातून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराच्या पाण्यामुळं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याने वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे तसेच नदीघाट लगतच्या … Read more

धोम धरणामधून 2600 क्युसेकने विसर्ग; कृष्णेला पूर, महागणपती मंदिर घाट पाण्याखाली

Satara News 20240731 082530 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवारी दुपारी धोम धरणामधून 2 हजार 600 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णेला पूर आला असून, वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला. अनेक मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धोम धरण 84 टक्के भरले आहे. … Read more

धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच; धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Dhom Dam News

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास सांडव्यावरुन २००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत … Read more

वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

Wai Crime News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना अज्ञात चोरटयांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा वाई पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई येथील मुख्य … Read more

अजितदादांच्या गटात गेलेल्या मकरंद पाटलांना परत पक्षात घेणार का? शरद पवारांनी एका शब्दात दिलं उत्तर; म्हणाले की,

Satara News 20240719 173720 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे येथे वाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची काल महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. वाई विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तुतारी चिन्हावरच उमेदवार उभा केला जाणार आहे. विद्यमान आ. मकरंद पाटील यांचा विषय आता सोडून देवू. त्यांच्या परतीचे मार्ग बंद केले आहेत, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष … Read more

आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कारवाई, वाईमध्ये 2 पिस्टल हस्तगत

Wai News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील परखंदी गावच्या हद्दीत एमआयडीसी रस्त्यावरील चौकात पिस्टल खरेदी विक्री करण्याकरीता आलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ देशी बनावटीची पिस्टल, २ काडतूस, ५ हजार ५०० रुपये रक्कम, २ मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा … Read more

पसरणी घाटातील 19 बेकायदेशीर होर्डिंगवर कडक कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक

Wai News 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर वाई तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क झाले असून विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पसरणी घाटात बांधकाम विभागाची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक असलेल्या तब्बल 19 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. पसरणी घाट ते पाचगणी पर्यंतचे घाटातील बेकायदा उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंग्स विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक झाले आहे. … Read more

कराडात नरेंद्र मोदी तर वाईत शरद पवारांची सभा; कोणाची सभा गाजणार?

Karad News 20240429 142344 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे. उदयनराजे भोसले आणि सांगलीचे उमेदवार … Read more

बावधन बगाड यात्रेचा बगाड्या ठरला,’या’ व्यक्तीला मिळाला ‘मान’

Bavadhan Bagad Yatra News jpg

सातारा प्रतिनिधी । साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये भरते. बावधन गावची बगाड यात्रा ही दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरवली जाते. मात्र, याची तयारी ही जवळ जवळ एक ते दीड महिना अगोदरपासून केली जाते. ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात यंदा ३० … Read more

वाईत महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांच्या बसवर दगडफेक; 3 जण जखमी!

Wai Bus of Tourists News

सातारा प्रतिनिधी । वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी पालघरहून एक पर्यटकांची बस वाईत आली होती. या बसमधील चालकाने बस पार्किंग करण्यासाठी रस्त्याकडेला उभी केली असता काही स्थानिकांनी अचानक दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून 3 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. जितेंद्र प्रभाकर तरे (वय 40), मोहन हरिचंद्र तरे (वय 62), प्रतीक दिलीप तरे (वय 21) अशी … Read more