गावकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम : अजय कुमार मिश्रा

Satara News 49 jpg

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत यात्रेचे ग्रामीण भागात आयोजन केले जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शनिवारी कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक … Read more

विकसित भारत संकल्प यात्रा 100 टक्के यशस्वी करा – सहसचिव अनिता शहा अकेला

Satara News 15 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन, केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शहा अकेला यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या सातारा जिल्ह्यातील सुरु असलेल्या अंमलबजावणीचा आढावा श्रीमती शहा अकेला यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला चांदवडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रा वाई तालुक्यात सुरु आहे. चांदवडी येथे या यात्रेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने चांदवडी गावातील नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांबरोबर राज्य शासनाच्या योजनांचे लाभ, सेवा, प्रमाणपत्रे, दाखले वाटप करण्यात आले. … Read more

‘उमेद’ने सोडवला ‘फायनान्स’चा विळखा; संकल्प यात्रेत एकाच दिवसात 11 कोटी वाटप

Satara News 24 jpg

सातारा प्रतिनिधी । वंचित घटकांना मुख्य प्रावाहात आणण्याबरोबर मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अनेक गरीब गरजू कुटुंबे अडकली आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानानने बचत गटाच्या माध्यमातून मोठा आधार देण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षात उमेद परिवारातील २ लाख पेक्षा जास्त कुटुंबांना सातशे आठ कोटी अर्थसहाय्य अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. आज एका दिवसात विकसित … Read more

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या 274 ग्रामपंचायतीमधील कार्यक्रमात 29 हजाराहून नागरिकांचा सहभाग

Satara News

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहचविण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २७४ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात २९ हजार २८८ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत … Read more

विकसित भारत यात्रेचे ग्रामीण जिल्ह्यात उत्साहात स्वागत

Satara News 21 jpg

पाटण प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज पाटण तालुक्यातील दिवशी बु. आणि पापर्डे तसेच खटाव तालुक्यात भोसरे येथे ग्रामस्थांनी उत्साहात यात्रेचे स्वागत केले. दिवशी बु. येथे ३ लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुलाचे मंजुरीपत्र देण्यात आले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत ज्योतिबा व पवनायी देवी बचत गटांना मंजूर झालेल्या कर्जाचे प्रत्येकी … Read more

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती

Satara Bharat Sankalp Yatra News jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे २४ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या यात्रेस आज कराड तालुक्यातील कोणेगाव … Read more

‘विकसित भारत संकल्प यात्रे’साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 8 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने दि. 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 22 गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा कामकाजाविषयी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते … Read more