सातारा जिल्ह्यात केवळ सातच लाडक्या बहिणी रिंगणात; आठ मतदारसंघात 109 पुरुष उमेदवार

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. मात्र, जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सात महिला उमेदवार निवडणूक रीगणात उतरल्या आहेत. त्यापैकी चार उमेदवार या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ या … Read more

जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार; 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार

Satara News 20241105 101542 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघातील 198 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे छाननीमध्ये वैध ठरले होते. आज सर्व मतदार संघातील एकूण 89 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये 255 फलटण 12 उमेदवार, 256 वाई 13, 257 कोरेगाव 10, 258 माण 12, 259 कराड उत्तर 12, 260 कराड दक्षिण 12, 261 पाटण 7 व 262 सातारा … Read more

आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस; लढतीचे चित्र स्पष्ट होणार

Politucal News 20241104 093539 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून २१५ उमेदवारांची २७९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. बुधवारी या अर्जांची प्रशासकीय छाननी झाली. यामध्ये १९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले; तर ८१ अर्ज अवैध ठरवण्यात आले. दरम्यान, आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ असून कोण कोण माघार घेणार … Read more

‘वंचित’चे सातारा जिल्ह्यातील आणखी 3 उमेदवार निश्चित; सातारा अन् कराड उत्तरचा लवकरच होणार उमेदवार जाहीर

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीबरोबरच वंचित बहुजन आघाडी, आरपीआयने देखील निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरवले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर करत शुक्रवारी वाई, पाटण आणि फलटणच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे वंचितचे आतापर्यंत जिल्ह्यातील … Read more

विधानसभेला पहिल्या दिवशी 6 अर्ज दाखल; फलटण, कोरेगावातून 2 तर कराड उत्तर अन् साताऱ्यातून एक अर्ज

Satara News 6 1

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सर्व विधानसभा संघासाठी निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली. काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज खरेदी केले तर काहींनी प्रत्यक्ष भरले देखील. मात्र, यामध्ये चर्चेत राहिलेले इच्छुक उमेदवार अभिजित बिचुकले यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासह पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, … Read more

विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; भाजप, वंचितने केले उमेदवार जाहीर

Satara News 20241021 210854 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने मंगळवार (दि. 22) पासून सुरुवात होत आहे. गावोगावी प्रचाराचा धुरळा उडला आहे. आता मंगळवारपासून उमेदवांराना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी (दि. 24) गुरुपुष्यामृत योग असून, अनेकांनी या मुहूर्तावर आपले अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनानेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन … Read more

आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे; जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

Satara News 20241015 200003 0000

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने दि. 15 ऑक्टोंबर आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केलेली आहे. आदर्श आचारसंहितेचे सातारा जिल्ह्यातील 8 ही विधानसभा मतदार संघात अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. या आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा झाल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी … Read more

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; राज्यात आचारसंहिता लागू, ‘या’ दिवशी होणार मतदान

Satara News 20241015 161722 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीची मंगळवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेत झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे ( Vidhansabha Election 2024 ) वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला … Read more