सातारा तहसील कार्यालयाला वाहनांच्या लिलावातून ‘इतका’ लाखांचा महसूल

Satara News 20240905 150837 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आवारामध्ये पडून राहिलेल्या 18 वाहनांचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. या लिलावातून तहसीलदार कार्यालयाला 18 लाख 93 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई दरम्यान अठरा वाहने जप्त करण्यात आली होती. ही वाहने कित्येक दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात पडून होती. या वाहनांच्या गर्दीमुळे पार्किंगचा गंभीर … Read more

कास पठार ते कास धरण रस्त्यावर पाणीच पाणी; वाहनधारकांची कसरत

Satara News 7

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा शहरात पावसाची संततधार सुरु असून शहरालगत असलेल्या बामणोली परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अशात कास पठार ते कास धरण रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला असल्याने त्यासाठी सातारा नगरपालिकेने तयार केलेला नवीन कच्चा पर्यायी रस्ताही पाणी साचून खचला आहे. … Read more

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपाधारकांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । पावसाळयात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी गेल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होऊन पंपचालक व वाहनधारक यांच्यामध्ये वाद होत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि., इंडियन ऑईल कार्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. या सर्व कंपनीचे सेल्स ऑफीसर यांना सातारा जिल्हयातील सर्व पेट्रोल पंपाचे भूमिगत टाकीची तात्काळ तपासणी करून त्यामध्ये पावसाचे पाणी … Read more

टोलवसुली विरोधात उंब्रजमधील नागरिक आक्रमक; एकत्रितपणे देणार निवेदन

Umbraj News 20240707 104414 0000

कराड प्रतिनिधी | तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांकडून घेण्यात येणारा टोल त्वरित थांबवण्यात यावा, यासाठी उंब्रज परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. टोलनाका व्यवस्थापनाला ग्रामपंचायत व नागरिकांच्यावतीने आज, दि. 7 रोजी सकाळी 11:30 वाजता निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच योगराज जाधव यांनी केले आहे. तासवडे टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनांना … Read more

एकाची साडेआठ लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी नवरा बायकोवर गुन्हा दाखल

Karad Crime News 20240704 205150 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सध्या फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. असाच पती पत्नीने एकाची फसवणुक केल्याचा गुन्हा नुकताच घडला असून भाडेतत्त्वावर वाहने घेऊन वाहन मालकांना भाडे तसेच संबंधित वाहने परत न करता साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील घारेवाडी येथील पती-पत्नीवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन आनंदराव वारुंग (रा. … Read more

कराडच्या शामगांव घाटात स्थिर निगराणी पथकाचा राहणार ‘वॉच’

Karad News 85 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीमुळे निवडणूक प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाईसाठी विविध पथके देखील तैनात करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने वाहनांची तपासणी कारण्यासाठी स्थिर निगराणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून शामगांव घाटात नुकतीच वाहनांची तपासणी देखील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्थापन … Read more

सातारा परिवहन विभागात 4 स्पीडगन इंटरसेप्टर वाहने दाखल

Satara News 20240401 174018 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने सातारा जिह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 स्पीडगन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. ही वाहने महामार्ग, राज्यमार्ग व अन्य ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. राज्याच्या परिवहन विभागाकडून सातारा जिह्याला 4 नवीन स्पीडगन इंटरसेप्टर वाहने मिळाली असून, या वाहनांत अत्याधुनिक यंत्रणा … Read more

कराड डीबी पथकाची मोठी कारवाई, दारूची वाहतूक करणाऱ्या बोलेरोसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Karad News 81 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आचारसंहिता सुरू असताना वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली. माहितीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेने बैल बाजार- मलकापूर रस्त्यावर गोकाक पेट्रोल पंपाजवळ … Read more

साताऱ्यात तलवारीसह काेयत्याने वाहनांची तोडफोड, गुंड लल्लन जाधवसह 5 जणांचे कृत्य; चाैघेजण ताब्यात

Satara News 2024 03 20T163447.429 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरालगत असलेल्या प्रतापसिंहनगरात गुंड अजय उर्फ लल्लन जाधव (वय २४, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याने साथीदारांच्या मदतीने हातात तलवार, कोयता घेऊन तब्बल १५ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले असून लल्लन जाधव पसार झाला आहे. … Read more

प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया – ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर

Karad News 50 jpg

कराड प्रतिनिधी | सहकारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतीच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया असल्याचे प्रतिपादन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले. कापील विकास सेवा सोसायटीच्या शताब्दी पूर्ती निमित्त सभासदांना भेटवस्तू, वाहन वितरण आणि ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे … Read more

वाहन मालकासह एजंटही अडकले कायद्याच्या कचाट्यात

Crime News 20240206 065400 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केलेल्या वाहनांचे जुन्या आरसी बुकवरील मूळ तपशिल काढून आवश्यक असणाऱ्या वाहनांचा तपशिल तयार करून बनावट आरसी तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ वाहन मालकांसह एजंटांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या काळी असलेल्या कागदी आरसी बुकच्या जागी आता डिजिटल … Read more

पुणे – बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघातात 2 मालट्रकसह 5 वाहनांना धडक

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे भरधाव वेगातील एका ट्रकने दोन मालट्रकसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र अपघातात सहा वाहने व हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 रोजी पहाटे साडे चार वाजण्याच्या … Read more