बोगस कागदपत्रांद्वारे केली जमीन बिगरशेती; हिंदकेसरी पैलवानासह दोघांना अटक

Crime News 20240710 130659 0000

सातारा प्रतिनिधी | राजाचे कुर्ले, ता. खटाव येथे ग्रामपंचायतीचा बोगस ग्रामसभा ठराव आणि ना हरकत दाखला सादर करून गावातील जमीन बिगरशेती केल्याप्रकरणी हिंदकेसरी – पैलवानासह दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदकेसरी पैलवान संतोष पांडुरंग वेताळ (रा. सुर्ली, ता. कराड जि. सातारा) व आनंदा शंकर मोरे (रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि. सांगली) अशी अटक … Read more

वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या सर्कल अन् तलाठ्याच्या अंगावर जेसीबी घालून खुनाचा प्रयत्न

Crime News 20240402 091117 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नढवळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत येरळवाडी धरण क्षेत्रातून बेकायदा वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निमसोडच्या मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्याला मारहाण करून जेसीबी अंगावर घालत खुनी हल्ला केल्याप्रकरणी वडूजच्या सात वाळूमाफियांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निमसोड विभागाचे मंडलाधिकारी शंकर चाटे (सध्या रा. वडूज, मूळ रा. खापरतोंड, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद … Read more

50 हजाराची लाच घेताना वडुजचा उपविभागीय अभियंता ‘जाळ्यात’; ACB विभागाची कारवाई

Crime News 20240327 082834 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा रोजगार हमी योजनेतील चार कामे पूर्ण केल्याचा दाखला देण्यासाठी बिलाच्या दोन टक्क्याप्रमाणे ६८ हजार रूपये लाचेची मागणी करून ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियत्यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. जितेंद्र राजाराम खलिपे (रा. पेडगाव रोड, वडूज, ता. खटाव), असे लाचखोर अभियत्याचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत … Read more

विषारी औषध पिल्याने मजुराचा मृत्यू; माजी सरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोरेगाव (निमसोड) येथील आनंदराव डोईफोडे यांना गावातील तिघा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. याप्रकरणी भीतीपोटी आनंदराव डोईफोडे यांनी किटकनाशक प्राशन केले होते. त्यांच्यावर सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी माजी … Read more

कोटपा कायद्यांतर्गत वडूजमधील 14 टपऱ्यांवर कारवाई

Crime News 17 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा रुग्णालयांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने (एनटीपीसी) ‘कोटपा’ कायद्यानुसार कारवी केली जात आहे. या कारवाई अंतर्गत नुकतीच वडूज येथील १४ टपऱ्यांवर धडक मोहीम राबवित ७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई व व्यापार वाणिज्य उत्पादन आणि नियमन) कायदा २००३ अर्थात … Read more