साताऱ्यात उद्या महायुतीचा मेळावा; नेत्यांनी लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

Satara News 20240113 112611 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांची महत्वाची बैठक काल साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यामध्ये उद्या साताऱ्यात होणाऱ्या महामेळाव्याचे ठिकाण ठरविण्यात आले.बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एकप्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. सातारा शहरात उद्या दि. १४ जानेवारी … Read more

पुण्यात बैठकीत अजितदादा अन् उदयनराजे एकत्र; सातारा जिल्हयातील विषयावर झाली चर्चा

Political News 20240112 104539 0000 jpg

कराड प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा साताऱ्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर उदयनराजे-अजित पवार यांच्यातील द्वंद साताऱ्यासह सबंध राज्याने पाहिले. अलिकडच्या काही वर्षात अधूनमधून एकमेकांवर टीका-टीप्पणी आणि टोमणेबाजीही पाहायला मिळत होती. मात्र, गुरूवारी पुण्यात दोघांमधील ही जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दोघांच्यात सातारा जिल्हयातील अनेक राजकीय विषयावर चर्चा देखील झाली. पुणे विभागाची राज्यस्तरीय … Read more

साताऱ्याचे खा. उदयनराजेंची दिल्लीत अमित शहांशी चर्चा; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 41 jpg

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले हे काहीना काही कारणावरून चर्चेत येतात. सध्या जाते त्यांच्या दिल्लीवारीवरून चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्न, प्रलंबित विकासकामावरून त्यांच्याकडून दिल्लीतील विविध खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या जात आहरेत. कामांबाबत पाठपुरावा केला जात आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याची भेट घेतली आहे. छत्रपती … Read more

महाराष्ट्राबाहेरील केंद्रीय कर्मचाऱ्यांना उदयनराजेंनी दिली गुड न्युज, शिवजयंतीची देखील मिळणार ऐच्छिक सुट्टी

Satara News 20231226 062038 0000 1 jpg

सातारा प्रतिनिधी | ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा (शिवजयंती) समावेश केल्याबद्दल साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले आहेत. यामुळे महाराष्ट्राबाहेर कार्यरत असणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी मिळणार आहे. वर्षातून मिळतात 2 ऐच्छिक सुट्ट्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दुसर्‍या परिशिष्ट सूचीमध्येही ऐच्छिक रजा मिळणार आहेत. परिशिष्टाच्या दुसऱ्या यादीतील सुट्ट्यांना … Read more

साताऱ्याचे खा. उदयनराजे दिल्ली दरबारी, केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे महत्वाची मागणी

Satara News 22 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत पर्यटकांसाठी बुद्ध सर्किट, रामायण सर्किट विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास भारतीयांबरोबरच … Read more

रेल्वेमंत्र्यांसोबतच्या भेटीवेळी खा. उदयनराजेंनी केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

Satara News 18 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या कराड- चिपळूण रेलवेमार्गासह रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वे आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विषय तसेच अजिंक्यतारा एक्सप्रेस आणि बाधित शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मागणी केली. खा. उदयनराजेंशी चर्चा झाल्यानंतर याबाबत तातडीने पाहणी करण्याच्या … Read more

कराडचा लोणावळा केल्यास तीव्र लढा उभारणार; माजी आ. आनंदराव पाटील यांचा इशारा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी | मलकापूर – कराड शहरातून पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. यात नांदलापूर ते कराड असा सुमारे ३.५ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचे काम काही महीनेपासून सुरु झाले आहे. हा उड्डाणपूल नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची स्वागत कमान ते कोयना नदीवरील नवीनपूल शहर हद्दीपर्यंत उतरणारा … Read more

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून वादाची ठिणगी?

Satara News 20231210 165820 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीवरून अनेक घडामोडींना वेग आला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेत महायुती विरुद्ध व्यूहरचना आखली. त्यानंतर आता महायुतीतील भाजप पक्षाच्या एका नेत्याने भाजप आपला उमेदवार उभा करून सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवणार असल्याचं सांगून टाकलं आहे. भाजप … Read more

कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी निधी मंजुरीचा धडाका; 2 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर

Karad News 6 jpg

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील जवळपास 23 गावांमधील विविध विकासकामांसाठी राज्यसभेचे सदस्य खा. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील विकासकामांना गती प्राप्त होणार आहे. कराड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी खासदार फंडातून निधी उपलब्ध व्हावा, अशी … Read more

उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का? खा. शरद पवारांनी दिलं ‘हे’ भन्नाट उत्तर

Sharad Pawar News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे काही कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशीसंवाद साधत अनेक राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. मात्र, यावेळी पत्रकारांनी त्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे उदयनराजे भोसले याचं मन भाजप आणि कुठं कुठं लागत नाही, त्यांना तुमच्या राष्ट्रवादीत घेणार का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला … Read more

कास धरणामुळे सातारकरांचा काय फायदा होणार?; खा. उदयनराजेंनी दिलं ‘हे’ उत्तर

Satara News 20231128 141154 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पुढील पन्नास वर्षांचा विचार करून कास धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या धरणामुळे शहराच्या विकासाचा वेग निश्चितच वाढेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, दुसऱ्या … Read more

जरांगे – पाटलांच्या भेटीनंतर हात जोडत उदयनराजेंनी राज्यकर्त्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाले की,

Satara News 4 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाबाबत लढणारे मनोज जरांगे – पाटील यांनी आज सातारा येथे स्वागत सभेस उपस्थित राहून मराठा बांधवांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर उदयनराजेंनी हात जोडत राज्यकर्त्यांना महत्वाची विनंती केली. जनगणना झाल्याशिवाय मार्ग निघू शकणार नाही. प्रत्येकाला जगायचा … Read more