पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात ऑईल सांडले; पुन्हा वाहतूक विस्कळीत

Khambatki Ghat News

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा घाट म्हणून खंबाटकी घाटाकडे पाहिले जाते. मात्र, घाटात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते. आज खंबाटकी घाटात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना घडली. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ऑईलमुळे गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. शनिवार आणि … Read more

खंबाटकी घाटात पुन्हा ट्रॅफिक जॅम, वाहतूक विस्कळित

Khambatki Ghat News 20240630 100734 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात रविवारी ट्रॅफिक जॅम झाले. भल्या पहाटे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच रांगला लागल्या. घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. सध्या पोलिसांकडून घाटात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पुणे – सातारा … Read more

कराडातील ‘हा’ रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटनांकडे पोलिस प्रशासनाचं दुर्लक्ष

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड-मलकापूर मार्गावरील मार्केटयार्ड परिसरात स्वा. सै. शामराव पाटील भाजीपाला व फळे मार्केट मार्गावर गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुमारे दोन तास एक किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या परिसरातीलच कराड – तासगाव मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती गेट नंबर तीन जवळ मंगळवारी काले येथील एका शिक्षकाचा मालट्रकखाली सापडून अपघाती … Read more

मलकापूरात सातारा-कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी; 9 तास वाहतूक कोंडी!

Crime News 20240502 105148 0000

कराड प्रतिनिधी | सहापदरीकरणासाठी पुणे बंगळूर महामार्गावर मलकापूरात केलेल्या बॅरिकेटींगमुळे वाहतूक कोंडी होत असते. मात्र, सातारा कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम झाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे पूर्वेकडील उपमार्गावरील सातारा-कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने … Read more

भोर-शिरवळ मार्गावर वडगावजवळ रस्त्यात झाड कोसळले; वाहतूक ठप्प

Tree News jpg

सातारा प्रतिनिधी । भोर- शिरवळ मार्गावरील उत्रोली – वडगाव ता. भोर येथील रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी तब्बल चार तासापासून शिरवळकडे जाणाऱ्या व भोरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. आज शनिवार, दि. २० रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अर्धवट जाळलेल्या अवस्थेत जळालेले वडाचे झाड उत्रोली-वडगाव जवळ महत्त्वाच्या वाहतुकीचा … Read more

खंबाटकी घाटात पुन्हा वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं शंभरहून अधिक वाहनं पडली बंद

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । तीन दिवस सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. कारण पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकेंडसाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्ग सोयीचा राहतो. त्यामुळे या महामार्गावरून जास्त वाहनांची रेलचेल असते. … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात पुन्हा खोळंबली 4 तास वाहतूक

Khabataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ ट्रक बंद पडल्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक तब्बल ४ तास खोळंबली होती. एक माल ट्रक गुरुवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील सहाव्या वळणावरून दत्त मंदिर परिसरातून निघाला होता. … Read more

साताऱ्याच्या खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; दिवाळी सुट्टीमुळे वाहतूक कोंडी

Khambataki Ghat News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा मार्गावरील महत्वाच्या असलेल्या खंबाटकी घाटात वाहनांच्या आज सकाळपासून लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दिवाळी सणामुळे सलग सुट्ट्या असल्याने मुंबई पुण्याहून कोल्हापूर, सातारा सांगली आणि कोकणात जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुणे- बंगळूर महामार्ग तसेच खंबाटकी घाटात अवजड तसेच लहान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी घाटामध्ये सतत सुरु … Read more

तासाभरातच पावसानं कराडकरांची उडवली दैना; कुठे नाले तुंबले तर कुठे वाहतूक खोळंबली

Karad Rain News jpg

कराड प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणेशोत्सवापासून सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसापासून पाऊस चांगलाच कोसळत आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारनंतर तासभर पडलेल्या पावसाने कराड शहराला चांगले झोडपून काढले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. तर पावसामुळे शहरातील भाजी विक्रेत्यांसह सर्वांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर … Read more

गणेश भक्तांवर वाहतूक कोंडीचे ‘विघ्न’; कात्रजसह खंबाटकी घाटात 3 तासांपासून ट्रॅफिक जाम

Satata Khabataki Ghat News 20230916 124338 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विकेंड तसेच शनिवार – रविवारी दोन्ही दिवशी लागून आलेल्या सुट्टीमुळे व गणेशोत्सवामुळे गणेशभक्त तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने पुणे-मुंबईहून गावी निघाले आहेत. मात्र, कात्रज घाट, खंबाटकी घाट या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सध्या खंबाटकी आणि कात्रज घाटात 3 तासांपासून मोठी वाहतूक … Read more

पुणे – सातारा मार्गावरील ‘या’ घाटात वाहनांच्या लांबच-लांब रांगा; नेमकं कारण काय?

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा व पुणे जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट असलेल्या पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात आज सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या घाट मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून घाट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसी सुट्टी असल्या कारणाने फिरायला … Read more