मिनी महाबळेश्वरवर पसरली धुक्यांची चादर !; पर्यटकांसह स्थानिक नागरिक थंडीत गारठले

Mahabaleshwar News 3

सातारा प्रतिनिधी । मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारला जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. या कडाक्याच्या थंडीसोबतच गार वारेही वाहू असल्याने पर्यटनास आलेल्या पर्यटकांसह स्थानिक नागरिक थंडीत गारठले आहेत. रात्रीच्यावेळी शेकाेट्या पेटू लागल्या असून सातारा शहराचा पारा मागील काही … Read more

वांग-मराठवाडी परिसरातील सौंदर्याची पर्यटकांना भुरळ; नेत्रसुखद अनुभवासाठी पर्यटकांची भेट

Patan News 6

पाटण प्रतिनिधी । पवनचक्कीची गरगर फिरणारी पाती, बाजूने हिरवेगार डोंगर आणि या डोंगराच्या कुशीत असलेले वांग-मराठवाडी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, वांग-मराठवाडी धरण पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. धरण परिसरातील व्यवसायांना त्यामुळे तेजी प्राप्त झाली असून पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. एका बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल … Read more

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना घडले पांढऱ्या शेकरूचे दर्शन

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आज गुरुवारी काही पर्यटकांना पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ शेकरुने दर्शन दिले. पांढऱ्या शेकरुला पाहण्यासाठी आणि त्याला कॅमेऱ्यात क्लिक करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक लोक प्रयत्न करत होते. शेकरु महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाबळेश्वर येथील जंगल परिसरात अनेक वन्यजीवांचे अस्तित्व असून या वन्यजीवांमध्ये प्रमुख आकर्षण शेकरुचे आहे. खारीपेक्षा आकाराने मोठी असणारी … Read more

कास पठारावर 17 रानगव्यांचा कळपाची एन्ट्री; पर्यटकांची पळता भुई थोडी

Kas News 20240927 145753 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळाचं कोंदण लाभलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सध्या बहरात आहे. देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. अशातच रानगव्यांच्या कळपानं एन्ट्री केल्यामुळे पर्यटकांची पळता भुई थोडी झाली. साताऱ्यापासून पश्चिमेकडे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सध्या बहरात आहे. या फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गुरूवारी पळता भुई थोडी झाली. … Read more

कास पठार फुलांनी बहरले; पर्यटकांसह रानगव्यांचा वाढला वावर

Kas News 20240923 135337 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कास पठारावर (Kas Plateau) मनमोहक फुलांचा गालिछा बहरला आहे. देशविदेशातील पर्यटकांना या पठारावरील अनेक फुले खुनावू लागले आहे. रविवारी कास पुष्प पठार पहावयास आलेल्या पर्यटकांना कास पठारानजीक फुलांसह रानगव्यांचे दर्शन झाले. त्यामुळे कास पठारावर गव्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. कास पठारावर पुष्प हंगाम सुरू झाला असून पुष्प … Read more

फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले कासकडे; लाल, पांढऱ्या रंगछटांचे होतेय दर्शन

Kas News 20240918 172716 0000

सातारा प्रतिनिधी | कास पठारावर फुलांचे सडे बहरत आहेत. लाल, पांढरी, निळी रंगछटा ठिकठिकाणी दिसू लागली आहे. फुलांचा साज लेऊन कास पर्यटकांच्या स्वागताला सज्ज झाले आहे. जागतिक वारसास्थळ कास पठाराच्या हंगामाचा प्रारंभ ५ सप्टेंबरपासून करण्यात आला. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला आहे. सध्या पठारावर काही ठिकाणी निळी टोपली कारवी, लाल … Read more

पोलिसांची हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई; पाटणमध्ये 11 गुन्हे दाखल

Patan News 2 2

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचे उंचावरून पडणारे धबधबे, ओढे-नाले आणि धरणामुळे मनमोहक हिरवाई पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात हजारो पर्यटक पाटण तालुक्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावतात. त्यातच हुल्लडबाज, मद्यपी, पर्यटकांची संख्या सार्वधिक असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याते धबधब्यावर सहलीसाठी येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी पाटण … Read more

चक्क उन्हाळ्यात ‘मिनी काश्मीर’ हरवलं धुक्यात, पर्यटक लुटताहेत थंडीचा आनंद

Mahabaleshwar News 20240526 215838 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असून उन्हाचा पारा कमालीचा असताना महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वर मात्र धुक्यात हरवलंय. वातावरणातील बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी आणि सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. अशा गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. वेण्णा लेकमधील नौका विहारासह विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने … Read more

मिनी काश्मीरमध्ये पर्यटक घामाघूम; पारा सरासरी 32 अंशांवर

Mahabaleshwar News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कायम गर्दी असते. महाबळेश्वरची संध्याकाळची गुलाबी थंडी, हिरवागार निसर्ग अशा वातावरणात महाबळेश्वर पर्यटनस्थळी गर्दी सध्या वाढत आहे. मात्र, दुपारच्या वेळी सूर्य चांगलाच तळपत असून पारा सरासरी ३२ अंशांपर्यंत जात आहे. परिणामी पर्यटकांच्या अंगातून घामाच्या धारा लागत आहे. तर उकाडा कमी करण्यासाठी महाबळेश्वरातील … Read more

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर पर्यटकांच्या गर्दीने बहरले

Mahabaleshwar News jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे सध्या नाताळच्या सुट्टयांमुळे पर्यटकांनी चांगलेच बहरले आहे. नाताळ सणामुळे या ठिकाणी सर्वत्र झगमगाट पहायला मिळत आहे. शनिवार, रविवार आणि ख्रिसमसची सोमवारची सुट्टी जोडून आल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. महाबळेश्वर व पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटक वाढू लागले आहे. हिवाळा म्हणतील कि थंडीचा … Read more

खंबाटकी घाटात पुन्हा वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं शंभरहून अधिक वाहनं पडली बंद

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । तीन दिवस सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. कारण पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकेंडसाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्ग सोयीचा राहतो. त्यामुळे या महामार्गावरून जास्त वाहनांची रेलचेल असते. … Read more

कास पठारास फुलाच्या हंगामात लाखो पर्यटकांची भेट; जमा झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा महसूल

Colorful flowers on Kas plateau News

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील रंगीबेरंगी रान फुलांच्या फुलोत्सवयामुळे या ठिकाणी लाखो पर्यटक भेटी देतात. यंदाही लाखोहुन अधिक पर्यटकांनी कास पठारास भेटी दिलय असून मागीलवर्षी पेक्षा दुप्पट फुलांबरोबरच तब्बल दीड कोटींचा महसूल जमा झाला आहे. यावर्षी दि. ३ सप्टेंबर रोजीपासून फुलांचा अधिकृत हंगाम सुरू झाला. यावेळी या ठिकाणी भेटी देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना … Read more