उदयनराजेंच्या मिरवणूक रॅलीत चोरट्यांची ‘हात की सफाई’, 10 तोळे दागिन्यांवर मारला डल्ला

Satara News 20240606 090445 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी उदयनराजेंची जल्लोषात मिरवणूक काढली. मात्र, या मिरवणुकीत चोरट्यांनी हात सफाई करत उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचे १० तोळ्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांना मिरवणूक पडली महागात सातारा लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर … Read more

फलटण तालुक्यात चोरीपूर्वी चोरट्यांकडून ड्रोनद्वारे पाहणी

Phaltan News 20240603 101024 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहराच्या ग्रामीण भागामध्ये चोरी करण्याचे प्रयत्न चोरट्यांकडून सुरू केले जात आहे. याबाबत फलटण तालुक्यातील खुंटे, जिंती परिसरामध्ये चोरट्यांकडून परिसराची ड्रोनने पाहणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. काळाप्रमाणे आता चोरटे सुद्धा हायटेक झाले असून ग्रामीण भागातील परिसरामध्ये ड्रोन उडवून त्या माध्यमातून परिसराची पाहणी करत आहेत. कोठे पहारेकरी आहेत? कोठे गस्त घालत … Read more

शिक्षकाचे कुटूंब बाहेर गेले असता चोरट्यांनी मारला सोन्याच्या दागिन्यांसह 10 लाखांवर डल्ला

Crime News 20240316 095550 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराजवळील खेड येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भरदविसा कडी तोडून १० लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास करण्यात आला. यामध्ये सोन्याचे २९ तोळे दागिने, रोख रक्कमेचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. तर पोलिसांनी विविध पातळीवर चोरट्याचा शोध सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

पालच्या यात्रेत चोरटयांनी चार भाविकांचे दागिने केले लंपास

Pal Yatra News 1 jpg

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस काळ पार पडला. मात्र, यात्रेत चोरीच्या घटना देखील घडल्या. चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल ३ लाखांचे दागिने गायब करण्यात आले. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाचजणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

साताऱ्यात पोलिसांच्या तावडीतून दुचाकी चोर पळाला; पुढं घडलं असं काही…

Satara News 47 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात काल अटक केलेल्या एका आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायाधीशांना भेटवून परत पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना दोन पोलीस शिपायांच्या तावडीतून दुचाकी चोरटा पळून गेला. हा प्रकार शनिवारी घडल्यानंतर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांची तपास पथके वेगवेगळ्या दिशेला चोरट्याला पकडण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. … Read more

झेडपीतील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर, CCTV बिघाडाचा चोरटे घेतायत फायदा

Satara ZP News jpg

सातारा प्रतिनिधी । राज्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख जिल्हा परिषदेची आहे. दररोज हजारो नागारिक या ठिकाणी काम निमित्त ये- जा करत असतात. यातील सातारा जिल्हा परिषदेत सध्या चोरीचे प्रकार घडत आहेत. कारण येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून दुचाकी चोरीसह चंदन … Read more

जनरेटर चोरणाऱ्यांस 4 तासात केली अटक; 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त

20230908 211305 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील सैदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी जनरेटर चोरून नेल्याची घटना घडली होती. यानंतर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास चक्रे फिरवत जनरेटर चोरीचा गुन्हा 4 तासात उघड करुन 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.यामध्ये टेम्पो व 2 संशयिता सह पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरीला गेलेला जनरेटरही ताब्यात घेतला आहे. याबाबत … Read more

हैद्राबाद, कर्जतमध्ये 33 लाखांच्या 3 ट्रकची विक्री करणाऱ्या आरोपीला वाई पोलिसांकडून अटक

Wai Crime News 20230902 190655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फसवणुक करुन परस्पररीतीने सुमारे 33 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 3 ट्रकची विक्री करणाऱ्या आरोपीला वाई पोलिसांनी अटक केली आहे. हैद्राबाद, कर्जत/ जामखेड, खुलताबाद (औरंगाबाद) येथुन आरोपीसह ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अब्दुल कादीर मोहम्मद अली सय्यद (वय 51) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई पोलीस … Read more

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 6 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पैशांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Crime News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात सध्या चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरे बुद्रुक येथील मधुकर कापसे यांच्या घराचे कुलूप तोडून रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरातील 6 तोळे सोने व 15 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील पिंपरे बुद्रुक हद्दीतील … Read more

चोरटयांनी 40 हजाराच्या बांधकाम साहित्यावर मारला डल्ला

karad taluka police station

कराड प्रतिनिधी । सध्या कराड व पाटण तालुक्यात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी त्यांच्याकडून कुठे घरफोडी तर कुठे लुटमारीचे प्रकार केले जात आहेत. दरम्यान आता चोरटयांनी आपला मोर्चा हा रस्त्याच्या बांधकाम साहित्याच्या चोरीकडे वळवला आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील सुर्ली येथे घडली आहे. या ठिकाणी असलेल्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातून सुमारे 40 हजार रुपये … Read more

सलग दोन रात्रीत ‘त्यानं ‘ 31 घरांवर टाकला दरोडा; लाखो रुपयांसह दागिने घेऊन झाला पसार

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या चोरट्यांकडून ग्रामीण भागात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील वाई तसेच जावळी तालुक्यात सलग 2 रात्रीत चोरटयांनी तब्बल 31 घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांसह दागिने लंपास गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. वाईत शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 तर दुसऱ्या दिवशी रात्री जावळीत भिवडीतील 7 बंद … Read more

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या मतदार संघात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली 4 दुकाने

Shambhuraj Desai News 3 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी घरफोडीचे प्रकार घडत आहेत. मागील महिन्यात कराड तालुक्यात घरफोडीचा प्रकार झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता चोरटयांनी आता आपला मोर्चा राज्य उत्पादन शुल्कमंत्री था सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार अंग असलेल्या पाटण तालुक्याकडे वळवला आहे. पाटण शहरातील मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे … Read more