जिल्ह्यात 7 हजार 859 भावी शिक्षकांनी दिला TET चा पेपर; फिंगरप्रिंटसह चेहऱ्याचेही स्कॅनिंग

Satara News 19

सातारा प्रतिनिधी । शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी साताऱ्यातील १३ केंद्रांवर दोन सत्रांत पार पडली. या परीक्षेतील दोन्ही सत्रांत मिळून ७ हजार ८५९ म्हणजेच ९३ टक्के परीक्षार्थीनी उपस्थिती लावली. कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा सुरळीत पार पाडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. परीक्षेतील … Read more

जिल्ह्यात शिक्षक पात्रता परिक्षा केंद्राच्या 13 ठिकाणी अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून जमावबंदी आदेश जारी

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । शिक्षक पात्रता परिक्षा सातारा शहरातील विद्यालय व महाविद्यालयांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 1 व दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होणार आहे. या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी नागेश पाटील यांनी लागू केले आहे. … Read more