GST आयुक्त वळवींच्या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठाचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश

Satara News 20240910 140522 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील झाडाणी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, गुजरात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांचा मूळ पत्ता शोधून आठवड्यात त्याचा तपशील सादर करावा, जेणेकरून झाडाणी प्रकरणात त्यांना प्रतिवादी ठरवून कामकाज पाहता येईल, असे निर्देश पुण्यातील … Read more

राज्यपाल नियुक्त आमदार घटनेतील निकषाप्रमाणे घ्या, अन्यथा राजभवनासमोर बेमुदत उपोषण करणार; सुशांत मोरेंचा इशारा

Satara News 20240908 153312 0000

सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपली असून लवकरच नवीन सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. या नियुक्ती करताना घटनेतील निकषानुसार राज्यपालांनी ती करावी तसे न केल्यास राजभवनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा साताऱ्यातील माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे. मोरे यांनी … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विकास योजनेत घोटाळा, तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

Satara News 20240903 163023 0000

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या बामणोली वनपरिक्षेत्रातील कारगाव ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून, कागदोपत्री खरेदी दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात असणाऱ्या समित्यांमधील भ्रष्टाचाराची … Read more

मुनावळे अवैध वृक्षतोड प्रकरणी 2.5 लाखांचा दंड; प्रधान सचिवांकडून प्रकरणाची दखल

Satara News 20

सातारा प्रतिनिधी । बामणोली वनपरिक्षेत्रात असलेल्या जावळी तालुक्यातील मुनावळे परिसरात व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये’ अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या प्रशांत डागा, शामसुंदर भंडारी, गणेश दिनकर भोसले यांना तब्बल २ लाख ४५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. थेट वनमंत्री आणि प्रधान सचिवांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्रधान सचिवांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालकांनी जलदगतीने … Read more

झाडाणी प्रकरणी चंद्रकांत वळवींसह दोघांबाबत शासनाकडे प्रस्ताव जाणार; उर्वरित 8 जणांवर लवकरच कारवाई

Crime News 20240729 220825 0000

सातारा प्रतिनिधी | सहयाद्री वाचवा मोहिमेतंर्गत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडानी प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात महाराष्ट्र, गुजरात राज्यासह देशात खळबळ माजली होती. या प्रकरणी तातडीने कार्यवाही होत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरु झाली होती.सोमवार दि.२९ जुलै रोजी याबाबत आज अंतिम सुनावणी होती. त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, या … Read more

संवेदनशील क्षेत्रातील अदानींच्या प्रकल्पाला कायदेशीर नोटीस; पर्यावरण कार्यकर्ते यांचा पुढाकार

Sushant More News 20240726 095616 0000

सातारा प्रतिनिधी | तारळी येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे बांधकामाधीन असलेल्या तारळी पंपिंग स्टोरेज हायड्रो प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग तसेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये सुशांत मोरे यांनी प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित … Read more

झाडाणीतील 620 एकर जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायालयाकडून स्युमोटो याचिका दाखल

Satara News 56

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्यात गाजत असलेल्या महाबळेश्वरमधील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी नुकतीच साताऱ्यात अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीस गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतः उपस्थिती लावली. दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांनी दि. २९ जुलैला सर्व कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले असून याच दिवशी या … Read more

जमीन घोटाळा सुनावणीसाठी जीएसटी आयुक्त कुटुंबासह हजर; मात्र, अप्पर जिल्हाधिकारीच गैरहजर

Satara News 20240703 154722 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळ्याच्या सुनावणीला अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी कुटुंबासह सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. परंतु, ज्यांच्या समोर सुनावणी होती, ते अप्पर जिल्हाधिकारीच मंत्रालयातील बैठकीला गेले असल्याने बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता गुरुवार, दि ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आपण प्रशासनास सहकार्य करू, अशा मोजक्या शब्दात … Read more

2 दिवसाचा मुक्काम करून सलमानने गाठली मुंबई; RTI अर्जामुळे महाबळेश्वरातून घेतला काढता पाय

Salman Khan News 20240622 072026 0000

सातारा प्रतिनिधी | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा महाबळेश्वरातील मुक्काम चांगलाच वादग्रस्त ठरला. ईडीन सील केलेल्या वाधवान बंधूच्या बंगल्याला वीज, पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली, अशी माहिती आरटीआय कार्यकर्त्यान मागवल्यानं सलमानने महाबळेश्वरातील आपला मुक्काम शुक्रवारी हलवला आणि थेट मुंबई गाठली. सील केलेल्या बंगल्यात मुक्काम डीएचएलएफ घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरातील अलिशान बंगल्यात सलमान खानचं वास्तव्य चर्चेचं ठरलं. … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा GST आयुक्तांना दणका, झाडाणी गावातील रिसॉर्टचं बेकायदेशीर बांधकाम पाडणार

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । मूळचे नंदुरबारचे रहिवासी आणि अहमदाबाचे जीएसटी आयुक्त असणाऱ्या चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची संपूर्ण जमीनच बळकावल्याचं प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर जीएसटी आयुक्ताने केलेलं बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. सुशांत मोरे यांच्या हाती … Read more

झाडाणीप्रकरणी प्रशासनाकडून ‘या’ दिवशी होणार सुनावणी; सामाजिक कार्यकर्ते मोरे उपोषणावर ठाम

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची ६२० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह तिघांना दि. ११ जून रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी वळवी यांचे वकील सुनावणीस उपस्थित राहिले. मात्र, कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागून घेतल्याने याबाबतची सुनावणी येत्या २० तारखेला होणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, … Read more

जीएसटी आयुक्ताच्या चौकशीसाठी झाडाणी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

Satara News 20240611 082016 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची संपूर्ण ६४० एकर जमीन बळकावणाऱ्या गुजरातमधील अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि नातेवाईकांच्या चौकशीची मागणी करत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे आणि झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत मुदत उपोषण सुरू केले आहे. चंद्रकांत वळवींनी केलेल्या अनधिकृत बांधकामा कारवाई व्हावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. साताऱ्यातील माहिती अधिकार … Read more