मतदार यादीत Deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही – निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । मतदारयादीत deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. अशी कोणतीही procedure मतदान केंद्रावर होत नसल्याची महत्वाची माहिती सातारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की, ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला … Read more

दुर्घटना टाळण्यासाठी अधिकारी अ‍ॅक्शन मोडवर; भांबवली, ठोसेघरला भेट

Satara News 20240714 072243 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून केळवली धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ठोसेघर, कास, भांबवली येथे भेटी देऊन विविध विभागांसमवेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध उपाययोजनाही सुचवल्या. ठोसेघर परिसरातील मालदेव धरणावर कायमस्वरूपी स्वयंसेवक नेमावा, पाण्यात पर्यटक … Read more

सातारा विधानसभा संघातील नव मतदारांची नोंदणी करावी : सुधाकर भोसले

Satara News 20240702 130641 0000

सातारा प्रतिनिधी | लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर नव मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मार्फत विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर नुकताच घोषीत केला आहे. त्याअंतर्गत २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील नव मतदारांची नोंदणी करावी, असे निर्देश प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिले. शाहू कलामंदिर सातारा झालेल्या बीएलओ … Read more

शनिवार अन् रविवारी सुट्टीच्या दिवशीही सातारा सेतू कार्यालय सुरु

Satara News 20240630 150955 0000

सातारा प्रतिनिधी | शाळा, महाविद्यालय तसेच नोकरीसाठी आवश्यक असणारे दाखले काढताना विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जुलै अखेरपर्यंत शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी सातारा सेतू कार्यालय सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले आणि सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी कर्मचार्‍यांना त्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. … Read more

राजकीय उमेदवारांच्या प्रचारात शासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्यास होणार कारवाई!

Satara News 2024 03 19T193530.097 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांची पदयात्रा, प्रचार आणि उद्घाटन आदी कार्यक्रमांसाठी अनुमती घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुमतींसाठी ‘एक खिडकी’ योजना चालू करण्यात आली आहे. विनाअनुमती निवडणुकीशी संबंधित कोणताही कार्यक्रम राबवल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच विविध राजकीय उमेदवारांच्या प्रचाराला शासकीय … Read more

अंतिम मतदार यादीमध्ये नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार : सुधाकर भोसले

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 262 सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करणेबाबतची मोहिम राबवून तयार झालेली मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या यादीत नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार असल्याची … Read more

नावे समाविष्ट करण्यासाठी सुमारे 6 हजार अर्ज प्राप्त : सुधाकर भोसले

Satara News 22 jpg

सातारा प्रतिनिधी । छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची नुकतीच बैठक घेण्यात आली. सर्व दुरुस्त्यासह अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादरम्यान प्रक्रियेच्या अनुषंगाने सूचना असल्यास सादर कराव्यात असे भोसले यांनी आवाहन करीत यावेळी … Read more

सातारा सेतू कार्यालयातील गैरव्यवहाराचा अहवाल प्रांतांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर

Satara News 5 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या तक्रारीची चौकशी प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केली आहे. सदर चौकशीचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना देण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी नेमकी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा सेतू … Read more

‘एक हात मदतीतून’ हजारो कुटूंबियांना मिळतोय आधार

Satara News 1

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या महसूल विभागांमार्फत राज्यात दि. 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत एक हात मदतीचा हा कार्यक्रम राबविला जात आहे. स्थलांतरित अशा कुटूंबीयांना जीवनावश्यक वास्तूच्या किटचे वाटप केले जात आहे. या किटच्या माध्यमातून कुटूंबीयांना एक प्रकारे आधारच मिळत आहे. महसूल सप्ताह अंतर्गत सातारा तालुक्यातील मेरावाडी येथे एक … Read more

सातारा तालुक्यातील 20 सजातील कोतवाल आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे जाहीर

Satara Taluka Released Reservation News

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील कोतवाल पद रिक्त सजाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सातारा तहसीलदार राजेश जाधव, सदस्य पोपट कोकरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत करण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सातारा- खुला प्रवर्ग, दरे बु.- खुला प्रवर्ग, कुसवडे- खुला महिला, आंबवडे … Read more