कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

Karad News 10 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. 1966 ते 2022 पर्यंतच्या सुमारे 800 विद्यार्थ्यांनी यावेळी स्नेहमेळाव्यास उपस्थिती लावली. यावर्षीचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गेल्या दहा वर्षातील पहिलाच मोठा स्नेह मेळावा ठरला. अबू चे कॅन्टीन, वसतिगृह, वर्ग खोल्या तसेच क्रीमरोल व चहा यांच्या सानिध्यात माजी विद्यार्थ्यांच्या अनेक जुन्या … Read more

साताऱ्यात शाळकरी मुलीचा तरुण करायचा पाठलाग; शेवटी मुलीच्या आईनं घेतला ‘हा’ निर्णय

Crime News 2 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीचा १७ वर्षीय तरुणाकडून पाठलाग करत “तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी बोलायचंय,” असं म्हणून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय तरुणावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाईंवर निलंबनाची कारवाई; खातेनिहाय चौकशीचे आदेश

Shirwal News jpg

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील अल्पवयीन मुलीने युवकाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी सांगवी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास अधिकारी शिरवळच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी फलटण पोलिस उपअधीक्षकाना … Read more

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ करणार अर्थ सहाय्य; इथे करा अर्ज

Satara Education News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात खूपच चांगली प्रगती झाली आहे. परंतु घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमूळे या घटकातील मुला – मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, म्हणून त्यांच्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज योजना पुन:श्च सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले असल्याची माहिती … Read more

Satara News : मराठा आरक्षणप्रश्नी सातारा बंदला हिंसक वळण; ‘या’ ठिकाणी आंदोलकांची ST बसवर दगडफेक

Man News jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे. काल कराड येथे सकाळ मराठा समाज बांधवांकडून विराट मोर्चा काढून आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यात आला. दरम्यान, काल माण तालुक्यात देखील गावोगावी बंद पाळत उपोषणे, आंदोलने करण्यात आली. या दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गोंदवले बुद्रुक मध्ये एका एसटी बसच्या … Read more

शालेय गणवेश घालून RPI कार्यकर्त्यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन…

Satara RPI News 20231003 225840 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करण्याचा नुकताच निर्णय शासनाने घेतला आहे. तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्याचा गणवेश घालून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनी समक्ष निवेदन स्वीकारावे, असा … Read more