टोल वसुलीसाठी एसटी बस रोखल्या; आनेवाडी टोल नाक्यावर तणाव

Satara News 20240906 090221 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या एसटी बसेसना राज्य शासनाने टोलची सवलत दिली आहे. असे असताना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांच्या सुमारे 50 एसटी बसेस आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ 3 बसस्थानकांच्या इमारतीसाठी 42 कोटी निधीस मंजुरी

Satara News 20240905 081520 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळातील सातारा विभागातील महत्वाच्या तीन एसटी आगारातील इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. सातारा, वाई व महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने सुमारे 42 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. सातारा विभागात पुणे-बंगलोर महामार्गावर मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाची ओळख आहे. या बसस्थानकावर सतत प्रवाशांची वर्दळ असते. … Read more

सातारा जिल्ह्यातील 8 हजार 735 लाडक्या बहिणी झाल्या अपात्र

Satara News 20240818 121815 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात स्वातंत्र्य दिनापर्यंत 5 लाख 12 हजार 367 महिला पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या महिलांना सुमारे 153 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे, तर केवायसी व इतर कमतरतांमुळे 8 … Read more

गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; ‘या’ कालावधीत होणार वितरीत

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । राज्यात दि. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. लाडक्या बाप्पाच्या भक्तांना राज्य शासनाने १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानांमधून १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत शिधा वितरीत केले जाणार असून सातारा जिल्ह्यातील साधारणतः 3 लाख 94 हजारहून अधिक रेशनकार्डधारक कुटुंबांना मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसात … Read more

सातारा जिल्ह्यात आल्याचा प्रश्न पेटला…! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आले वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड

Satara News 20240724 093646 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा सांगली औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करूनच आल्याची खरेदी केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत … Read more

दिव्यांग मेळाव्यातून बच्चू कडूंचा राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले,”तुम्हारी क्या औकाद”

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे रयत आधार सोशल फाउंडेशन व प्रहार जनशक्ती पक्षाचा नुकताच दिव्यांग मेळावा पार पडला. या मेळाव्यातून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी “जिसका कोई नही, उसका प्रहार है यारो”असे गौरवोद्गार काढले. मात्र, लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “शेतकऱ्यांना शेतातील पिकाला चांगला … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात थेट बांधावर जाऊन अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेची अर्ज नोंदणी

Satara News 20240710 171113 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे घोषणा केली. या घोषणेनंतर त्याची नेमकी अंमलबजावणी कशी केली जाणार?हे देखील सरकारने सांगितले. आता प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू असून अंगणवाडी सेविका थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरुन … Read more

जिल्ह्यातील जलप्रकल्प, तलाव होणार गाळमुक्त : गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांना शासनाकडून मंजुरी

Satara News 14

सातारा प्रतिनिधी । पावसाने यंदाच्या वर्षी ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली असताना मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने धरण आणि छोट्या-मोठ्या जलाशयांतील गाळ काढण्याची मोहिमी हाती घेतली आहे. त्यानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेतून ११.८४ लाख घनमीटर आणि लोकसहभागातून ४.५० लाख घनमीटर गाळ … Read more

आता जनावरांना इअर टॅगिंग असेल तरच त्यांची खरेदी-विक्री करता येणार

Satara News 10

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा निर्णय घालण्यात आला असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत टॅगिंग करणे बंधनकारक होते. आता ही मुदत ३१ … Read more

जिल्ह्यातील 8 तालुके ‘डोंगरी’च्या पूर्ण तर 3 तालुक्यांचा उपगटात समावेश

Satara News 2024 03 18T174648.355 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील अनेक गावांचा नव्याने डोंगरी विभागात समावेश केला आहे. शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या शासन निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांचा डोंगरी विभागात समावेश करण्यात आला आहे. तर जिह्यातील आठ तालुक्यांचा पूर्णगटात आणि तीन तालुक्यांचा उपगटात समावेश करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण, … Read more

राज्याचे 3 वर्षांचे कृषी पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातील 11 शेतजकऱ्याचा सन्मान

Satara News 2024 02 24T144226.661 jpg

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. शुक्रवारी राज़्य शासनाने २०२० ते २०२२ या तीन वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. यामध्ये माण, खंडाळा, वाई आणि फलटण तालुक्यातील प्रत्येकी दोघां शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार मिळाला आहे. कृषी, कृषी संलग्न … Read more

राज्य शासनाकडून GR जारी; जिल्ह्यातील आणखी 12 महसूल मंडलात दुष्काळ

Satara News 76 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे राज्य शासनाकडून दोन तालुके आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर करुन उपायोजनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसविलेल्या १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. गेल्यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार … Read more