जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांच्या दळणवळणासाठी 449 ‘लालपरी’ सहभागी होणार

Satara News 58

सातारा प्रतिनिधी । देश, राज्याच्या कारभारात मतदान हा महत्त्वाचा भाग मानला जातो. लोकशाहीचा हा उत्सव बुधवार, दि. २० रोजी साजरा होणार आहे. या उत्सवात सातारा जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांची ने- आण करण्यासाठी तब्बल ४४९ ‘लालपरी’ सहभागी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे नोंदविण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण, … Read more

रामलल्लांच्या दर्शनासाठी सातारा-अयोध्या ST जाणार; 25 नोव्‍हेंबरला 45 भाविक होणार रवाना

Satara News 22

सातारा प्रतिनिधी | अयोध्या येथील रामल्लांची प्राणप्रतिष्ठापनेनंतर दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील भाविक जाणार आहेत. या भाविकांसाठी एसटी महामंडळाने सातारा ते अयोध्या ही थेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्या येथे रामलल्लांच्या दर्शनासोबत शेगाव, काशी, प्रयागराज, अलाहाबाद ही एकाच प्रवासात पाच ठिकाणी साडेसात हजारांत देवदर्शन मिळणे शक्य होणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरला सातारा येथून पहिली बस जाणार … Read more

कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरला सातारा जिल्ह्यातून जाणार 122 जादा ST गाड्या

Satara News 20

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांनी जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे आणि एसटीकडून भाविकांच्या प्रवाशाच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कार्तिकी एकादशी उद्या असून या एकादशीला राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरपूरला जात जाणार आहेत. त्यांची ही कार्तिकी वारी सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य परिवहन … Read more

कोरेगावात वसना नदीच्या पुलावर अपघात; बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Crime News 20241109 095518 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव- सातारा रस्त्यावर येथील रेल्वे स्टेशनजवळून वाहणाऱ्या वसना नदीच्या पुलावर काल रात्री पावणेदहाच्या सुमारास एसटी बसला समोरून धडक दिल्याने बुलेटस्वार जागीच ठार झाला. गजानन हिरामण जाधव (वय ३५, रा. सस्तेवाडी, वीस फाटा, ता. फलटण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-सातारा रस्त्याने कोरेगाव आगाराची सोलापूर- सातारा ही … Read more

जिल्ह्यातून दिवाळीत लालपरी धावणार सुसाट; विविध भागांत वाढविल्या 31 जादा फेऱ्या

ST Bus News

सातारा प्रतिनिधी | दिवाळीच्या सुट्या सुरू असलेल्या प्रत्येकाला या सणानिमित्ताने आपल्या माणसांना भेटण्याची ओढ लागली आहे. हीच मनोकामना लालपरी पूर्ण करणार आहे. या काळात प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. सातारा जिल्ह्यातून विविध भागात जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. विविध भागात सरासरी ३१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारकरांचे … Read more

जावली गावाच्या हद्दीत एसटीची दोन चाके निखळली; प्रवासी बचावले

ST News 20241014 093801 0000

सातारा प्रतिनिधी | कास-बामणोली या दुर्गम भागातील एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला आहे. अशीच एक घटना नुकतीच सावरी तालुका जावली गावाच्या हद्दीमध्ये घडली. गोगवे सातारा बसची दोन चाके निखळून गेल्यामुळे भीषण अपघात होता होता वाचला. दैव बलवत्तर म्हणूनच एसटीतील प्रवासी सुखरूप राहिले. सातारा एसटी आगारातून पहाटेे साडेपाच वाजता सुटणारी सातारा- कास – बामणोली … Read more

कराडात एसटी प्रवासात एक लाखाच्या पाटल्या लंपास

Karad Crime News 20240930 081826 0000

कराड प्रतिनिधी | एसटी प्रवासात महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या अडीच तोळे वजनाच्या पाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या. शहरातील कोल्हापूर नाका येथे ही घटना घडली. याबाबत सिंधू पवार (रा. कोकीसरे, ता. पाटण) यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पाटण तालुक्यातील कोकीसरे येथील सिंधू पवार या पती आत्माराम पवार यांच्यासह कहऱ्हाडला आल्या होत्या. शहरातील … Read more

कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटीमध्ये कॉलेजच्या तरुणीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

Satara News 20240925 102934 0000

सातारा प्रतिनिधी | कराड येथून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. २३) रोजी घडली. राजेंद्र रामचंद्र रसाळ (रा. यशवंतनगर, वाई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी २१ वर्षांची असून, … Read more

टोल वसुलीसाठी एसटी बस रोखल्या; आनेवाडी टोल नाक्यावर तणाव

Satara News 20240906 090221 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या एसटी बसेसना राज्य शासनाने टोलची सवलत दिली आहे. असे असताना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांच्या सुमारे 50 एसटी बसेस आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. … Read more

साताऱ्यात बेमुदत आंदोलनामुळं लालपरीची चाकं थांबली, एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्तेच्या वक्तव्याचा केला निषेध

Karad News 20240904 092434 0000

कराड प्रतिनिधी | प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सातारा विभागातील ९०६ फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. कृती समितीला किडे समिती म्हणणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्यांचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला. खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्याऱ्यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे साताऱ्यात प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. प्रवाशांना … Read more

रत्नागिरीतील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचे होणार हाल

Karad News 20240820 222703 0000

कराड प्रतिनिधी | रत्नागिरीत होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील एसटी गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. साताऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाल्यानंतर आता रत्नागिरीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. लाभार्थी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बसेस रत्नागिरीला मागविण्यात … Read more

रक्षाबंधनासाठी सातारला येत असताना दुचाकीची एसटीला धडक, अपघातात युवकाचा मृत्यू

Accident News 20240819 073428 0000

सातारा प्रतिनिधी | रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकीने धडक दिली. या अपघातात आदित्य संजय साळुंखे (वय २३, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा), या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य हा रत्नागिरी … Read more