संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 15 1

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पालकमंत्री श्री.देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर खेख, … Read more

शंभूराज देसाईंवर ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाची सडकून टीका; म्हणाले, गद्दारी करून मिळवलेलं मंत्रीपद…

PatanNews

पाटण प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदार संघात कमी मताधिक्य मिळाले. त्यांच्या घटलेल्या मताधिक्याची जबाबदारी स्वीकारत काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी “मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे,” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानावरून आता उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी देसाई यांच्यावर … Read more

पाटणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री देसाईंचं मंत्रीपदाबाबत मोठं विधान; मुख्यमंत्री शिंदेकडे करणार ‘ही’ महत्वाची मागणी

Patan News 20240608 210409 0000

पाटण प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे प्रत्यक्षात शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे मोठे विधान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. … Read more

पुनर्वसन कामांबाबत पालकमंत्री देसाईंनी प्रशासनास दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी, (जिंती), काहीर, या अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे. या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाअंतर्गत बाधित कुटुंबाना द्यावयाची प्रस्तावित असलेली 558 घरकुले व इतर सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ही कामे गतीने आणि दर्जेदारपूर्ण करा, असे निर्देश … Read more

पोलीस विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देसाईंचे महत्वाचे विधान; म्हणाले की,

Satara News 20240607 211930 0000

सातारा प्रतिनिधी | महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाचा भरोसा- सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा प्रकल्प राज्यासाठी निश्चितपणे दिशादर्शक व आदर्शवत ठरेल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभाग राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा … Read more

पोलिसांच्या अनोख्या अभियानातील बुकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Satara News 33

कराड प्रतिनिधी | सध्या मोबाईल, संगणक, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्किंग साईट, इत्यादी गोष्टींचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हे घडण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता करण्याकरीता जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दि. १ जुलै २०२४ … Read more

सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंवर साधला निशाणा; म्हणाल्या की,

Political News 1

सातारा प्रतिनिधी । पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाकडून केल्या जात असलेल्या हप्ते वसुलीचा पाढाच अंधारे व धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांच्या समोर वाचून दाखवला. अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

पालकमंत्र्यांच्या घराशेजारील भिंतीवर रेखाटलेलं उदयनराजेंचं तैलचित्र पुसलं, नेमकं कारण काय?

Satara News 20240422 113634 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील भिंतीवर रेखाटल्या गेलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या तैलचित्राचा ‘ईश्यू’ झाल्याने हे तैलचित्र रातोरात पुसले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून चित्र पुसून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. सातारा शहरात पोवई नाक्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे घर आहे. या घराच्या बाजूलाच असलेल्या … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाटोळेतील पहिल्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रकल्प आराखड्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Shambhuraj Desai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र असून यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रशिक्षण केंद्रासाठी ३४८ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांची क्षमता वृद्धी … Read more

पालकमंत्री देसाईंनी मतदारसंघात घेतला जनता दरबार; प्रत्येक अर्जांवर 2 महिन्याच्या आत कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

Patan News 20240311 070936 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पाटण पंचायत समिती येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस … Read more

महिला तक्रारदारांपर्यंत पोलीस 10 मिनिटात पोहोचतील अशी यंत्रणा कार्यान्वित करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 8 jpg

पाटण प्रतिनिधी । “पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी दहा मिनिटाच्या आत त्या तक्रारदार महिले पर्यंत पोहोचेल, अशी यंत्रणा पोलीस विभागाने कारणीत करावी,” असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज घेतला. यावेळी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

साताऱ्यातील गुंतवणूक परिषदेत उद्या राज्य शासनासोबत होणार सामंजस्य करार

Satara News 2024 03 04T191205.245 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे उद्या मंगळवार दि. 05 रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मास भवन, एमआयडीसी, एरिया, सातारा येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सकाळी 10 वाजता आयोजित परिषदेत राज्य शासनासोबत सामंजस्य करार होणार … Read more