रहिमतपुरात शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून रॅलीसह मानवी साखळीद्वारे मतदान जागृती

Rahimatpur News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती अभियानातंर्गत रहिमतपूर नगरपरिषदेमार्फत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,आणि कन्या प्रशाला रहिमतपूर यांच्या सहयोगाने मतदान जनजागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीचे रहिमतपूर शहरात आयोजन करण्यात आले. ‘आपल्या मतामुळे होणार आहे लोकशाहीचा सन्मान, अवश्य करा मतदान’ असे संदेश फलक घेऊन रॅली काढण्यात … Read more

सातारा जिल्ह्यातील 594 प्राथमिक शाळांमध्ये आता सीसीटीव्हीची नजर

Satara CCTV News

सातारा प्रतिनिधी | विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 622 पैकी 594 माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या … Read more

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’मध्ये कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक मिलिटरी अपशिंगे शाळेचं उदयनराजेंकडून कौतुक

School News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा महाराष्ट्र शासनाच्या 2024-25 या वर्षाचा वतीने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” कोल्हापूर विभागात विभागीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेने मिळवलेल्या यशाचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कौतुक केलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच फेसबुक पोस्ट केली असून त्यामध्ये … Read more

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत महाबळेश्र्वर गिरीस्थान प्रशालेने पटकावला दुसरा क्रमांक

Mahabaleshawar News 20240925 183805 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्र्वर गिरीस्थान प्रशालेने दुसरा क्रमांक पटकवला. या अभियानाचा दुसरा टप्पा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. महाबळेश्वर गिरीस्थान प्रशालेत पायाभूत सुविधा मध्ये शालेय फर्निचर,पर्यावरण पूरक शाळा, सर्व वर्ग खोल्या सुबक रंगरंगोटी करून बोलक्या भिंती कऱण्यात आल्या. संपूर्ण प्रशालेच्या चेहरा मोहरा बदलण्यात आला असून शासनाच्या शैक्षणिक … Read more

आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा ‘रयत’च्या सर्व शाळांना देणार – खासदार शरद पवार

Satara News 20240922 161652 0000

सातारा प्रतिनिधी । “आज शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत. आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले. … Read more

खा. शरद पवारांच्या हस्ते आज होणार कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Karad News 20240922 123408 0000

कराड प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्थेची गावामधील संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे भूषविणार आहेत. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आक्टोबर १९१९ … Read more

साताऱ्यात पार पडला अनोखा उपक्रम; 1200 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Satara News 20240915 110838 0000

सातारा प्रतिनिधी | पर्यावरण हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम समाजात राबविले जातात. असाच एक उपक्रम सातारा येथे परब पडला आहे. ताऱ्यातील उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या 1200 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किल्ले चंदन वंदन गडावर गोळा केलेल्या 12 लाख 78 हजारांच्या विविध प्रजातांच्या बियांचे गडावर रोपण केले. ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमांतर्गत हे … Read more

जिल्हा परिषदेतील ‘या’ 25 शाळांमध्ये घडणार आता बालवैज्ञानिक

Satara News 20240908 131651 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक द़ृष्टिकोन रुजावा याअनुषंगाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे असून जिल्ह्यातील 25 प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रयोग शाळेतून विविध प्रयोग केल्यानंतर विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाल्यास जिल्ह्यातून … Read more

माझी शाळा आदर्श शाळा कार्यशाळेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

Satara News 20240904 103516 0000

सातारा प्रतिनिधी | माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम जिल्हा परिषदेतील शाळेंमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणारा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, शाळा समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी सहकार्य करून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत स्व. यशवंतराव सभागृहात कार्यशाळेचे आयोजन … Read more

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; कोयना धरणात 77.70 TMC पाणीसाठा

Jitendra Dudi News

सातारा प्रतिनिधी । भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि. 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयातील सर्व … Read more

साताऱ्यात विद्यार्थी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर; घेतले शेतीचे धडे

Satara News 20240703 193132 0000

सातारा प्रतिनिधी | कृषिप्रधान देशात मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीच्या शिक्षणाचे धडे मिळणे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे व या कष्टातून पिकलेले अन्न वाया न घालविण्याची सवय लागणे यांची जाणीव मुलांना या वयातच होणे ही काळाची गरज ओळखून प्रतिवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेती व शेती संबंधित सर्व उत्पादन प्रक्रियांची माहिती … Read more

वसंतगडला डोरेमॉनसह छोट्या भीमने केले विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

Karad News 23

कराड प्रतिनिधी । जिल्ह्यातील २ हजार ६८२ शाळांची पाहिली घंटा शनिवारपासून वाजण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या थाटामाटात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कराड तालुक्यात तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रतीकात्मक डोरेमॉनसह छोटा भीम, मिली माउस अवतरले होते. कराड तालुक्यातील वसंतगड येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या विठ्ठल गणोजी माने हायस्कूलमध्ये देखील नवीन … Read more