साताऱ्याचा पुण्यात झाला सन्मान; शासनाच्या घरकुल योजनेत मिळवलं अव्वल स्थान

Satara News 2024 03 02T164228.130 jpg

सातारा प्रतिनिधी । अमृत महाआवास अभियान ग्रामीणमध्ये विभागस्तरावर केंद्राच्या प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत सातारा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने २८ पैकी तब्बल १६ पुरस्कार मिळवले असून याबद्दल पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

Satara News 20240225 090136 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे. या जलरथाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साॅफ्टवेअर खरेदीसाठी ZP कडून प्रशासकीय मान्यता

Satara News 60 jpg

सातारा प्रतिनिधी । आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत ८४ केंद्रांसाठी साॅफ्टवेअर खरेदीच्या प्रशासकीय मान्यतेवर चर्चा पार पडली असून काही केंद्रातील दुरुस्ती, विस्तारीकरण आणि स्मार्ट केंद्र अनुषंगिक कामे करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या ‘मिशन धाराऊ’ अभियान राज्यभर राबविण्याच्या सूचना

Satara News 38 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने एक अभियान सुरु करण्यात आले होते. ते आता राज्यभर राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ माता दुग्धामृतम्’ अभियान सुरू केले होते. या अभियानाचे यश पाहून महिला … Read more

साताऱ्यात मानधनवाढीसाठी आशा अन् गटप्रवर्तकांकडून निदर्शने

Satara News 37 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने आज सातारा जिल्हा परिषदेसमोरआंदोलन करण्यात आले. मानधनवाढीचा अध्यादेश काढावा, यासह विविध मागण्या यावेळी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलनात कल्याणी मराठे, … Read more

सातारा ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा याशनी नागराजन यांनी स्वीकारला पदभार

Satara News 2024 02 07T122936.730 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झालयानंतर त्यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर याशनी नागराजन यांनी मंगळवारी ठीक सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर ठीक अकरा वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन विविध विभागांचा आढावा … Read more

सातारा ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन

Satara News 20240206 072500 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या आज मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. तर यामुळे जिल्हा परिषदेला प्रथमच महिला आएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. नगाराजन या आता ३६ व्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या … Read more

साताऱ्यात सत्वशीला भाभींचा रूद्रावतार, अधिकाऱ्यांना म्हणाल्या, Bring The Saline Here, Do It, Move..

Satara News 78 jpg

सातारा प्रतिनिधी | विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा परिषदेसमोर नऊ दिवसांपासून ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण (भाभी) या आंदोलनस्थळी आल्या होत्या. संघटनेच्या राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांची प्रकृती खालावल्याचे पाहून त्या शासकीय अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. सलाईन इथे घेऊन या, तातडीने जा, अशा कडक … Read more

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात उद्या विविध कार्यक्रम

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या गुरुवारी दि. २५ रोजी सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत सर्वसमावेशक प्रचार- प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी … Read more

प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने सातारा ZP कडून महत्वाच्या सूचना

Satara ZP News 20240121 051731 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रजासत्ताकदिनानिमित्त २६ जानेवारीला सातारा जिल्ह्यातील १४०० हून अधिक ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार आहे. यामध्ये युवा मतदार जागृती, कामांचा खर्च आढावा, माझी वसुंधरा अभियान, घरकुल योजना मान्यता, घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापन आदींसह १५ विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या या ग्रामसभांना खूप … Read more

भविष्य निर्वाह निधीच्या वरीष्ठ सहाय्यकास 3 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

Crime News 20240118 072546 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षकाकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना सातारा जिल्हा परिषदेतील वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या वरिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हेमंत विठोबा हांगे, असे लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे. भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या 24 कर्मचाऱ्यांना आनंदी सेवा निवृत्ती योजनेचा लाभ

Satara News 43 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदी सेवा निवृत्तीच्या लाभाचे वितरण गुरुवारी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या हस्ते निवृत्तीच्या लाभाचे वाटप करण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आनंदी सेवा निवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण, … Read more