पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल

Crime News 13

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, तरुणींच्या विनयभंगच्या घटना अधून मधून घडत आहेत. मागील महिन्यात कराडहून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता एका महाविद्यालयीन तरुणीवर शेतात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला पेट्रोल टाकून … Read more

‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मारहाण करून खूनच, पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

Crime News 20240629 194052 0000

सातारा प्रतिनिधी | केळवली, ता. सातारा येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मारहाण करुन खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संबंधितांनी कोणत्या कारणातून खून केला याची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश धोंडिबा जांगळे (वय २५) असे … Read more

टेम्पो चालकाला खाली ओढून ‘त्यांनी’ शिवीगाळ करत केला धारदार शस्त्रहल्ला

Crime News 20240622 104122 0000

सातारा प्रतिनिधी | शिवीगाळ करत ’35 हजार रुपये देणार आहे की नाही,’ म्हणत टेम्पो अडवून चालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना सातारा तालुक्यातील लिंब खिंड येथे घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चाैघांविरुद्ध दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रूपेश गुलाबराव चव्हाण (रा. दहिगाव, ता. कोरेगाव) आकाश चव्हाण (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) अशी गुन्हा … Read more

मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न, मुख्य संशयितासह चार जण ताब्यात

Satara News 4 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटखळ गावामध्ये मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चाैघांना ताब्यात घेतले आहे. अनिल मधुकर शिंदे (वय ४४, रा. पाटखळ, ता. सातारा), असे जखमीचे नाव … Read more

साताऱ्यात दुचाकीला धडक देऊन गेला होता पळून;12 तासांच्या आत पोलीसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील हिट अँड रन प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या वाहन चालकाला 12 तासांच्या आत पकडण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी फत्ते केली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या टीमने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अपघात करून गेलेले वाहन व चालक यांना ताब्यात … Read more

AC रूममध्ये राहिला अन् बिल न देता पळाला; जकातवाडीतील एकावर गुन्हा

Satara News 2 2

सातारा प्रतिनिधी | हाॅटेलमध्ये राहून बिलाची रक्कम आॅनलाईन पाठविल्याचे भासवून ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांबरवाडी येथील एका हाॅटेलात घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जकातवाडीच्या एकावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी चंद्रसेन धनंजय जाधव (रा. पोवईनाका सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार पंकज गणपत बाबर (रा. … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराडच्या महाविद्यालयातील तरूणाची आत्महत्या

Satara Crime News 20231003 082201 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराड येथील महाविद्यालयातील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. श्रीराज मानसिंग पाटील (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील … Read more

लग्नात खाऊन-पिऊन चोरट्यानं मारला दागिन्यांवर डल्ला

Crime News

कराड प्रतिनिधी । सनई चौघड्याचा आवाज, सर्वत्र पाहुण्यांचा गोंधळ, एकमेकांच्या सोबत बोलण्यात, भेटीगाठी घेण्यात दंग असलेल्या लग्नसोहळ्यात अज्ञात चोरट्याने अगदी जेवणाचा आस्वाद घेऊन तब्बल 3 लाख 14 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना सातारा तालुक्यातील वर्ये या ठिकाणी शुक्रवार, दि. 23 रोजी घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more