निसराळे ते जावळवाडी रस्त्यावर रात्रीच्यावेळी बिबट्याची डरकाळी

Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील निसराळे ते जावळवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. रविवारी रात्रीच्या सुमारास या मार्गावरून निघालेल्या चारचाकी वाहनासमोर बिबट्या आवा आला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील निसराळे गावातील कमानीच्या समोरून आणि त्या परिसरातील शिवारात तसेच वारणानगर ते जावळवाडी येथील … Read more

सातारा तालुक्यातील ‘या’ गावात बाटली आडवीचा ठराव सर्वानुमते मंजूर

Crime News 8

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील पाडळी गावात महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. पाडळी गावाचा संपूर्ण तालुक्यात ज्योतिर्लिंग देवाचा वारसा तसेच शिक्षकांचे गाव असा परिसरात नावलौकिक आहे. तसेच या गावात अलीकडच्या काळात दारू विक्रीच्या माध्यमातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये या भावनेतून गावातील महिलांनी ग्रामपंचायतीला संपूर्ण दारूबंदीचा ठराव करावा, अशी मागणी एकमुखाने … Read more

कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले

Satara News 5 jpg

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात अनेक भागांना आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील सातारा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. उकाड्याच्या वातावरणात पावसाच्या सरी बरसल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज … Read more

साताऱ्यातील कंपनीच्या आवारात आढळले बिबट्याचे 3 बछडे, एक निघाला ब्लॅक पँथर!

Satara News 2024 03 25T110830.976 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील एका कंपनीच्या आवारात रविवारी सकाळी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यात एक काळा रंगाचा बछडा होता. त्यामुळे ब्लॅक पॅंथरचा बछडा आढळून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. या बछड्यांची वनविभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत वैद्यकीय तपासणी केली. नंतर त्यांची मादी बिबट्याबरोबर भेट घडवून आणली. साताऱ्यात आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यांमध्ये एक बछडा पूर्णता काळ्या … Read more

सातारा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांची मतदार यादी प्रसिद्ध

Satara News 20240119 122155 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील 7 सहकारी संस्थांचा संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूक येणाऱ्या काळात होणार आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी सदर सहकारी संस्थाच्या प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थेच्या नोटीस बोर्डावर 18 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर ज्या … Read more

साताऱ्याच्या साहिल शिकलगारच्या टोळीतील 4 जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

Borgaon Police Station

कराड प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील नागठाणे येथील साहिल शिकलगार व त्याच्या टोळीतील त्याच्या साथीदाराने एक व्यक्तीला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साहिल शिकलगार याच्यासह त्याच्या 3 साथीदारांना अटक केली असून मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. १) साहिल रुस्तुम शिकलगार रा. नागठाणे, ता. जि. सातारा, … Read more

“आता जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन करू नका”; ‘या’ गावातील संतापलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडे विनंती

Morewadi In Satara Taluka

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचला आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असून आमचा जीव गेल्यावर पुनर्वसन करू नका,” … Read more

साताऱ्याचे जवान विजय कोकरे यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara Jawan Vijay Kokre

कराड प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील सांडवली (वारसवाडी) येथील जवान विजय रामचंद्र कोकरे यांचे गुरुवारी श्रीनगर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव शनिवारी मुंबईत आणण्यात आले. तसेच त्यांच्या पार्थिवावर टागोरनगर (विक्रोळी, मुंबई) येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्याचे जवान विजय कोकरे यांचे गुरुवारी … Read more

पावसाळ्यात कासला फिरायला जातायं? ‘हा’ मार्ग आहे वाहतुकीसाठी पूर्णपणे दिवस बंद

Sambarwadi Yevteswar Ghat News

सातारा प्रतिनिधी । अतिवृष्टी आणि भूस्सखलनामुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा – यवतेश्वर – कास या घाटातील धोकादायक दरड कोसळल्यास मोठया प्रमाणावर जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड / दगड फोडण्याची कार्यवाही दि. 24 जुलै रोजी कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. … Read more

सातारच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण

Satara Jawan Vijay Kokare

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्याच्या परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. त्यांच्या वीरमरणाने परळी परिसर शोकसागरात बुडाला आहे. परळीतील जवान विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. शालेय जीवनापासून देशसेवेत जाण्याची त्यांची जिद्द होती. 2017 मध्ये मोठ्या कष्टाने ते स्वप्न विजय यांनी पूर्ण … Read more

सातारा तालुक्यातील 20 सजातील कोतवाल आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे जाहीर

Satara Taluka Released Reservation News

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील कोतवाल पद रिक्त सजाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सातारा तहसीलदार राजेश जाधव, सदस्य पोपट कोकरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत करण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सातारा- खुला प्रवर्ग, दरे बु.- खुला प्रवर्ग, कुसवडे- खुला महिला, आंबवडे … Read more