बोगस कागदपत्रांद्वारे केली जमीन बिगरशेती; हिंदकेसरी पैलवानासह दोघांना अटक

Crime News 20240710 130659 0000

सातारा प्रतिनिधी | राजाचे कुर्ले, ता. खटाव येथे ग्रामपंचायतीचा बोगस ग्रामसभा ठराव आणि ना हरकत दाखला सादर करून गावातील जमीन बिगरशेती केल्याप्रकरणी हिंदकेसरी – पैलवानासह दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदकेसरी पैलवान संतोष पांडुरंग वेताळ (रा. सुर्ली, ता. कराड जि. सातारा) व आनंदा शंकर मोरे (रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि. सांगली) अशी अटक … Read more

विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण, नेताजी सुभाषचंद्र विद्यालयातील दहावीच्या बॅचचा उपक्रम

Karad News 20240710 121431 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील येळगाव येथील दहावी -१९९६ च्या बॅचच्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने परिसरातील प्राथमिक शाळांमधील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. जन्माला येताना प्रत्येक जण मातृऋण, पितृऋण. कुळऋण. समाजाचे ऋण, मातृभूमीचे ऋण, अशी कित्येक ऋणं घेऊनच जन्माला येतो. त्यातून याच जन्मी मुक्त व्हायचं असतं. त्यानुसार समाजाच्या ऋणातून … Read more

कराडात जीपची तोडफोड करुन युवकांना केली मारहाण; 13 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240710 105921 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील मुख्य टपाल कार्यालय नजीक जीपची तोडफोड करून युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. सोमवार दि. ८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम शहाजी बाकले (वय २६, रा. जुळेवाडी, ता. कराड) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी … Read more

आषाढी एकादशीला पंढरपूरला पूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना घेराव घालणार; ‘या’ समितीने दिला इशारा

Satara News 20240710 093807 0000

सातारा प्रतिनिधी | महसूल यंत्रणेकडून आदिवासी समाजाला अनुसूचित जातीचे दाखले देण्यासाठी तांत्रिक कारणे काढून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे तसेच काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 28 जून रोजी ठरलेली महत्त्वाची बैठक रद्द केली त्यामुळे या जमातींचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहिले आहे त्याबद्दल येथे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालणार असल्याचा इशारा आदिवासी … Read more

BJP आमदाराच्या कोरोना काळातील घोटाळ्याचा उल्लेख करत जयंत पाटलांनी केले विधानसभेत थेट आरोप

Satara News 20240709 213941 0000

सातारा प्रतिनिधी | आज विधानसभेत सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला. गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याच्या झाडानीतील घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोग्य विभागाचे धक्कादायक प्रकरण बाहेर काढले. भाजपच्या एका आमदाराने कोरोना महामारीच्या काळामध्ये मृत झालेल्या व्यक्तींना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींमधून … Read more

सातारा जिल्ह्यातील धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेश बंदीबाबत पालकमंत्री देसाईंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240709 195441 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे, जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतींनी प्रवेश बंदीचे फलक लावावेत. सडावाघापूरसह इतर ठिकाणीही पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. पालकमंत्री शंभूराज … Read more

साताऱ्यात थोरल्या पवार काकांनी धाकट्या पुतण्यावर साधला निशाणा; म्हणाले, एखाद्या बहिणीला तरी…

Satara News 20240709 184141 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा संस्थापक शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेला भेट दिली. यावेळी कार्यक्रमानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी अजित पवार यांना लाडकी भिन योजनेवरील तोलेही लगावला. “राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाकडी बहीण योजनेचं स्वागत आहे. कुठल्या का होईना बहिणींना द्यावा”, … Read more

झाडाणीतील 640 एकर जमीन खरेदी करणाऱ्या GST अधिकाऱ्याच्या कारवाईची विजय वडेट्टीवारांकडून अधिवेशनात मागणी

Satara News 20240709 155157 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कांदाडी खोऱ्यात वसलेल्या झाडाणी या गावात गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचे प्रकरण सातारा जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मंगळवारी गौप्यस्फोट केला. “मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाडाणी गाव आहे. हे गाव आणि त्याच्या परिसरातील 640 एकर जमीन गुजरातमधील एका अधिकाऱ्याकडून अत्यंत … Read more

कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी राज्य सरकारकडुन 96 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

Karad News 20240709 133310 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी राज्य सरकारकडुन 96 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या निधीतून स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे. कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या नुतनीकरणामुळे स्टेडीयमचे रुपडे पालटणार असुन खेळाडुंचीही चांगली सोय होणार आहे. कराड येथे खेळाडुंच्या सोयीसाठी पालिकेकडुन छत्रपती शिवाजी … Read more

लंडनच्या म्युझियममधील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखांचं साताऱ्यात ‘या’ दिवशी होणार आगमन

Satara News 20240709 122320 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. येत्या १९ जुलैला वाघनखांचे साताऱ्यात आगमन होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. वाघनखांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, वनमंत्री सुधीर … Read more

जिल्ह्यात आपत्ती उपाययोजनांसाठी 162 कामांचा 482 कोटींचा आराखड्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर

Satara News 20240709 111721 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत १६२ कामांचा समावेश असलेला ४८२ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. भारतीय सर्वेक्षण खात्याने केलेल्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणांनी दरड व भूस्खलन प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूरप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंती आदि कामांचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ व अतिपर्जन्याचा असून … Read more

जिल्ह्याला रेड अलर्ट; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 20240709 100321 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 31.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर 30.09 टक्के धरण भरले आहे. एक जूनपासून … Read more