मुनावळे जलपर्यटनसाठी राज्य शासनाकडून पुरवणी अर्थसंकल्पात 53 कोटी 22 लाखांची तरतूद

Satara News 20240711 094536 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुका असलेल्या जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलपर्यटनासाठी राज्य शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात 53 कोटी 22 लाखांची तरतूद केली आहे. या पर्यटन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे. पाण्यातील देशातील सर्वात मोठा जलपर्यटन प्रकल्प मुनावळे याठिकाणी उभारण्यात येत आहे. मुनावळे … Read more

जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

Satara News 20240711 084206 0000

सातारा प्रतिनिधी | राज्याच्या ग्रामविकास विभागाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेकरता सातारा जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी … Read more

साताऱ्यात पेन्शन अदालतीवर सेवानिवृत्तांचा बहिष्कार

Satara News 20240711 074813 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पंचायत समितीमध्ये बुधवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी अदालत सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये ‘माझा स्टाफ अकार्यक्षम’ असल्याचे कारण सांगून काढता पाय घेतला. यामुळे पेन्शन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या अदालतीवरच बहिष्कार टाकला. यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सातारा पंचायत समितीत बुधवारी सकाळी 10 वाजता … Read more

सातारा जिल्ह्यात झाला ‘इतका’ पाऊस; पहा तालुका निहाय आकडेवारी

Satara Rain News 20240710 223527 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मग्लवर आणि बुधवारी दोन दिवसात पावसाने अल्पशा हजेरी लावली. दि. 9 जुलै रोजी सरासरी 1.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 324.3 मि.मी. पाऊस पडला आहे. तर कोयना पाणलोट क्षेत्रात देखील आज बुधवारी पावसाने कमी हजेरी लावली असून धरणात 32.79 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. … Read more

‘माऊली’च्या वारीत आरोग्य विभागाकडून 59 हजार वारकऱ्यांवर औषधोपचार!

Phaltan News 20240710 212942 0000

सातारा प्रतिनिधी | आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज आहे. वारीमार्गावर सातारा जिल्हा हद्दीत प्रत्येक एक किलोमीटरवर रुग्णवाहिका उभी आहे. तर जिल्ह्यातील चार दिवसांच्या मुक्कामात आतापर्यंत तब्बल ५९ हजार वारकऱ्यांवर आैषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच १८९ जणांना दाखल करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज … Read more

कराडात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहानेंचे डिजिटल साधनांचा वापर अन् डोळ्यांचे आरोग्य या विषयावर शुक्रवारी व्याख्यान

Karad News 20240710 201835 0000

कराड प्रतिनिधी | रोटरी क्लब ऑफ कराड चा 68 वा पदग्रहण सोहळा शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता येथील स्व.यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे पद्मश्री प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी त्यांचे डिजिटल साधनांचा वापर व डोळ्यांचे आरोग्य या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच रो. सदस्य डॉ. … Read more

फलटणमध्ये उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

Phalatan News 20240710 191753 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात थेट बांधावर जाऊन अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेची अर्ज नोंदणी

Satara News 20240710 171113 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे घोषणा केली. या घोषणेनंतर त्याची नेमकी अंमलबजावणी कशी केली जाणार?हे देखील सरकारने सांगितले. आता प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू असून अंगणवाडी सेविका थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरुन … Read more

चीट फंड घोटाळ्यातील दळवीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सातारा जिल्ह्यातील अनेकांना घातलाय गंडा

Crime News 20240710 160540 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेकांना गंडा घालणाऱ्या व पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून लुटणाऱ्या विष्णू पांडुरंग दळवी (रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला बेड्या ठोकण्यात आल्या. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून कराड येथील पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. विष्णू दळवी याने डोलो इन्फ्रास्ट्रक्चर, कालकम रिअल इस्टेट, डीएसपी गोल्ड एल.एल.पी, … Read more

माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

Phalatan News 20240710 135033 0000

सातारा प्रतिनिधी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला. फलटण मधून सकाळी माऊलींची पालखी बरडच्या दिशेने मुक्कामासाठी जात असते. जाताना … Read more

बोगस कागदपत्रांद्वारे केली जमीन बिगरशेती; हिंदकेसरी पैलवानासह दोघांना अटक

Crime News 20240710 130659 0000

सातारा प्रतिनिधी | राजाचे कुर्ले, ता. खटाव येथे ग्रामपंचायतीचा बोगस ग्रामसभा ठराव आणि ना हरकत दाखला सादर करून गावातील जमीन बिगरशेती केल्याप्रकरणी हिंदकेसरी – पैलवानासह दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदकेसरी पैलवान संतोष पांडुरंग वेताळ (रा. सुर्ली, ता. कराड जि. सातारा) व आनंदा शंकर मोरे (रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि. सांगली) अशी अटक … Read more

विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण, नेताजी सुभाषचंद्र विद्यालयातील दहावीच्या बॅचचा उपक्रम

Karad News 20240710 121431 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील येळगाव येथील दहावी -१९९६ च्या बॅचच्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने परिसरातील प्राथमिक शाळांमधील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. जन्माला येताना प्रत्येक जण मातृऋण, पितृऋण. कुळऋण. समाजाचे ऋण, मातृभूमीचे ऋण, अशी कित्येक ऋणं घेऊनच जन्माला येतो. त्यातून याच जन्मी मुक्त व्हायचं असतं. त्यानुसार समाजाच्या ऋणातून … Read more