जिल्हा नियोजनच्या खर्चातून नवीन मोटर बसवून घ्या; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना

Karad News 20240719 114810 0000

कराड प्रतिनिधी | जुन्या जॅकवेलची दुरुस्ती करून कराड शहराचा पाणीपुरवठा सुरु झाला पण रात्री अचानक या ठिकाणची मोटर बंद पडली. मोटरीचे वायडिंगचे मोठे काम असून ती दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना काल दिली. त्यानुसार काल सकाळीच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून जुन्या जॅकवेल … Read more

शिरवळमध्ये नादुरुस्त कंटेनरला टेम्पोची धडक; एकजण जागीच ठार

Accident News 20240719 110818 0000

सातारा प्रतिनिधी | नादुरुस्त कंटेनर व टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना पुणे – बंगळूर महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा येथे बुधवारी घडली. या अपघातामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला. किरण वसंत मोरे (वय ३५, रा. मोरेमळा, ता. पलूस, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरवळ … Read more

सातारा ठोसेघर रस्त्यावर झाड उन्मळून पडले; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

Satara News 20240719 095840 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा सज्जनगड रस्त्यावर बोगद्यातून बाहेर आल्यावर हॉटेल माउंटन व्यू नाजिक भले मोठे झाड पावसाने उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडत … Read more

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज साताऱ्यात; शिवरायांच्या वाघनखे दालनाचे उद्घाटन

Satara News 20240719 092033 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन आणि वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन आज शुक्रवार, दि. १९ राेजी साताऱ्यात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री व काही मंत्री सातारा दाैऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनवरुन मुंबईत आली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ही वाघनखे साताऱ्यात आणण्यात आली. शुक्रवारी … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Satara News 20240719 080611 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. प्रतीक सुरेश जमदाडे (वय २७, रा. इंगळेवाडी, पोस्ट नुने, ता. सातारा), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक जमदाडे हा साताऱ्यातील शाहूनगरमध्ये राहत होता. बुधवारी सायंकाळी तो राहत्या घरातून अजिंक्यताऱ्यावर गेला. … Read more

केंद्र सरकारच्या दुबळ्या धोरणांमुळे जवानांचे हौतात्म्य क्लेशदायक

Satara News 20240719 074017 0000

सातारा प्रतिनिधी | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर गुरुवारी आंदोलन केले. ‘केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावेळी देशाच्या सीमेवर दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्करातील जवान हुतात्मा होण्यास केंद्र शासनाचे दुबळे धोरण कारणीभूत आहे. केंद्रीय गृह मंत्रालय याबाबत काय धोरण आखत आहे? दुबळ्या धोरणांचा फटका लष्करातील जवानांना … Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामुळे वाचले 35 हजार रुग्णांचे प्राण, 2 वर्षात 275 कोटींची मदत : मंगेश चिवटे

Magesh Chivte News 20240718 212216 0000

सातारा प्रतिनिधी | ‘राज्य शासनाने सुरू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे दोन वर्षात ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहेत. तसेच या कक्षाद्वारे २७५ कोटीची वैद्यकीय मदतही करण्यात आली आहे,’ अशी माहिती सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली. वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज सातारा … Read more

जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस वाढला; नवजाला ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Koyna Dam News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. आज पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील धारण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत नवजा येथे सर्वाधिक 55 मिलीमीटरची नोंद झाली असून कोयनेत 44 आणि महाबळेश्वरला 31 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 45.16 टीएमसी … Read more

जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हेच BJP अन् RSS चं धोरण; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

Prithviraj Chavan News

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये हिंसाचाराची घटना घडली. या ठिकाणी प्रचंड नासधूस करण्यात आली होती. प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगला वादामध्ये आला आहे. या सर्व प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. “राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता … Read more

कराड पालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीत खडाजंगी; पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना नागरिकांचा रास्ता रोकोचा इशारा

Karad News 33

कराड प्रतिनिधी । कराड शहराच्या पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आज करात नगर पालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अधिकारी आणि नागरिक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच कराड शहरातील पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत न झाल्यास रास्तारोको करून कराडमध्ये येणारी सर्व वाहतूक रोखण्याचा इशारा … Read more

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणीचा दोन लाखांचा टप्पा पार

Satara News 76

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 2 हजार 131 महिलांचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी हा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार … Read more

‘वयोश्री’ अंतर्गत ज्येष्ठांना साधने, उपकरणासाठी मिळणार 3 हजार रुपये

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । ६५ वर्षांवरील किंवात्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य करण्यासाठी शासनाने राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी शासनाकडून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. शासनाकडून … Read more