ढेबेवाडी-पाटण मार्गावर दिवशी घाटात पुन्हा कोसळली दरड

Patan News 15

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाची रिपरिप सुरू असून ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. घाटात छोट्या मोठ्या दरडी पंडत आहेत. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ढेबेवाडीकडून पाटणकडे कामानिमित्त निघालेल्या पोलिस पाटलांच्या गाडीच्या समोरच दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दिवशी घाटातून बाहने चालवताना वाहनधारक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे दरडी पडत … Read more

साताऱ्यात रात्री बैठक घेत अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले, तुम्हाला विचारात घेऊनच…

Ajit Pawar News 20240720 100918 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे शुक्रवारी शिवशस्त्र शौर्यगाथा शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आदल्या दिवशी गुरूवारी रात्रीच सातारा येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. तसेच रात्री राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार … Read more

कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 20240720 093323 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असून, धरण निम्म्याने भरण्याच्या मार्गावर आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस कायम आहे. कोयनेचा जलसाठा साडेतीन टीएमसीने वाढून 50.76 टीएमसी तर 48.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या नऊ तासांत कोयना धरणक्षेत्रात १६५ मिलीमीटर (साडेसहा इंच) एकूण २,२८८ मिलीमीटर (वार्षिक … Read more

साताऱ्यात कार्यक्रमावेळी उदयनराजे भलतचं बोलून गेले; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या सहाय्याने औरंगजेबाचा…

Satara News 20240719 221454 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. उद्या म्हणजेच शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. आज प्रदर्शनाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजेंचा गोंधळ उडाल्याचे … Read more

वाघनखं योग्यवेळी आलीत त्याचा योग्यवेळी वापर करु, मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

Satara News 20240719 204030 0000

सातारा प्रतिनिधी | वाघनखं आली हा अभिमानाचा दिवस आहे. पण, वाघनखांबद्दल काही लोक शंका उपस्थित करतात हे दुर्दैव आहे. चांगल्या कामाला गालबोट लावण्याचं हे काम आहे. तरीही ही वाघनखं योग्यवेळी आलीत. त्याचा योग्यवेळी वापर करु, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. बसले तर तोंड उघडूनही सांगता येत नाही, … Read more

अजितदादांच्या गटात गेलेल्या मकरंद पाटलांना परत पक्षात घेणार का? शरद पवारांनी एका शब्दात दिलं उत्तर; म्हणाले की,

Satara News 20240719 173720 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे येथे वाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची काल महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. वाई विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तुतारी चिन्हावरच उमेदवार उभा केला जाणार आहे. विद्यमान आ. मकरंद पाटील यांचा विषय आता सोडून देवू. त्यांच्या परतीचे मार्ग बंद केले आहेत, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष … Read more

नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व कसे कळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

Satara News 20240719 153858 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये छत्रपती शिवरायांनी वापरलेल्या नखांसारखी वाघनखे लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार, … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आणखी 30 पाण्याचे टँकर कराड शहराच्या सेवेला

Karad News 20240719 140512 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहराचा पाणी प्रश्न वाढत असून अशी आणीबानी याआधी क्वचित निर्माण झाली असावी पण सद्या हा पाणी प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. याचमुळे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने कराड शहरासाठी आणखी 20 पिण्याच्या पाण्याचे टँकर शहर वासियांसाठी दाखल झाले आहेत. पाणी प्रश्न परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी कराड … Read more

गजापुरातील दगडफेक, जाळपोळीच्या घटनेप्रकरणी देसाईंनी दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की,

Karad News 20240719 132132 0000

कराड प्रतिनिधी | विशाळगडाच्या परिसरात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. अतिक्रमण विशाळगडावर होते आणि दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलीकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेतली असती, तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. तेथील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तेथील सर्व प्रकरणाची माहिती घेऊन दोषींना शोधून काढून कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज … Read more

जिल्हा नियोजनच्या खर्चातून नवीन मोटर बसवून घ्या; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना

Karad News 20240719 114810 0000

कराड प्रतिनिधी | जुन्या जॅकवेलची दुरुस्ती करून कराड शहराचा पाणीपुरवठा सुरु झाला पण रात्री अचानक या ठिकाणची मोटर बंद पडली. मोटरीचे वायडिंगचे मोठे काम असून ती दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना काल दिली. त्यानुसार काल सकाळीच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून जुन्या जॅकवेल … Read more

शिरवळमध्ये नादुरुस्त कंटेनरला टेम्पोची धडक; एकजण जागीच ठार

Accident News 20240719 110818 0000

सातारा प्रतिनिधी | नादुरुस्त कंटेनर व टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना पुणे – बंगळूर महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा येथे बुधवारी घडली. या अपघातामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला. किरण वसंत मोरे (वय ३५, रा. मोरेमळा, ता. पलूस, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरवळ … Read more

सातारा ठोसेघर रस्त्यावर झाड उन्मळून पडले; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

Satara News 20240719 095840 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा सज्जनगड रस्त्यावर बोगद्यातून बाहेर आल्यावर हॉटेल माउंटन व्यू नाजिक भले मोठे झाड पावसाने उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडत … Read more