कराडात कृष्णा घाटाच्या पायऱ्यांना पाणी; कोयना धरणात ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर कोयना धरणातील पाणी कराड येथील प्रीतिसंगम घाटावरील पायऱ्यांना सायंकाळी लागले आणि पायऱ्या पाण्याखाली … Read more

माऊलींच्या पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सर्वत्र साजरी करण्यात आली. सातारा जिल्ह्यात माऊलींच्या परतीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. माऊलीची पालखी पंढरपूरला दर्शन घेतल्यानंतर परती सुरु झाला. परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवरती वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना आज नुकतीच घडली आहे. सुमारे अर्ध्या तासापूर्वी माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या … Read more

संवेदनशील क्षेत्रातील अदानींच्या प्रकल्पाला कायदेशीर नोटीस; पर्यावरण कार्यकर्ते यांचा पुढाकार

Sushant More News 20240726 095616 0000

सातारा प्रतिनिधी | तारळी येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे बांधकामाधीन असलेल्या तारळी पंपिंग स्टोरेज हायड्रो प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग तसेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये सुशांत मोरे यांनी प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित … Read more

साताऱ्यातील वाईमध्ये महिला गेली ओढ्याच्या पुरात वाहून, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद

Crime News 20240726 085117 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दाणादाण उडवली आहे. त्यामुळे जावळी महाबळेश्वर वाई तालुक्यातील अनेक साखरपुल पाण्याखाली गेली असून ओढ्यांना देखील पूर आला आहे. धनावडे वस्ती (ता. वाई) येथील ३८ वर्षीय महिला किवरा ओढ्याच्या पुरात वाहून गेली आहे. शिल्पा प्रकाश धनावडे, असं महिलेचं नाव असून तिचा अद्याप शोध लागलेला नाही. मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळी … Read more

वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, संगम माहुलीतील मंदिरांच्या पायऱ्यांना टेकले पाणी

Venna River News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट घोषित केलेला आहे. तर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे. गुरुवारी दुपारी कण्हेर धरणातून … Read more

कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे दीड फूट उचलले; 10 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु

Patan Rain News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे. यावेळी एक … Read more

सातारा जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट; पाटण जावळीसह महाबळेश्वरमधील 700 कुटुंबे स्थलांतरित

Satara Rain News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तर उद्या शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांना … Read more

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; कोयना धरणात 77.70 TMC पाणीसाठा

Jitendra Dudi News

सातारा प्रतिनिधी । भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि. 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयातील सर्व … Read more

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; पालकमंत्री देसाईंच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सायंकाळी चार वाजता पाणी सोडण्यात येणार असलयामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत पूर … Read more

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारासह सांगली, कोल्हापूर रेल्वे स्थानकांना भेट कराडकडे मात्र पाठ

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । पुणे – मिरज – बंगळुरू व मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही काम ७ ते ८ वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा वारंवार वाढवूनही याबाबत संबंधित ठेकेदार व रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रवासी संघटना, व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आदीनी रेल्वे प्रशासनाबाबत आक्रमक पावित्रा घेतल्याने याची गंभीर दखल घेत … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहा:कार; धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठा 75.26 टीएमसी झाला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरण 71.51 टक्के भरले असून धरणात 75 हजार 215 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, आज दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. दरवाजातून १० हजार … Read more

वाल्मीक पठारावर जाणाऱ्या जाधववाडी-मत्रेवाडीमधील घाटात रस्ता खचला

Valmik Plateau News

पाटण प्रतिनिधी | कराड,पाटण तालुक्यासह ढेबेवाडी खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे ढेबेवाडी विभागातील डोंगरावरील अनेक गावचा रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत. ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर जाणाऱ्या पवारवाडी (कुठरे) निगडे मार्गावरील घाटातील रस्ता मुसळधार पावसामुळे जाधववाडी दरम्यानच्या धोकादायक वळणावरच खचला आहे. वळणावरच रस्ता खचला असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अगोदर … Read more