मालट्रकच्या धडकेत पादचारी जागीच ठार; चालक ताब्यात, लोणंदमधील शास्त्री चौकात अपघात

Crime News 1

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील गजबजलेल्या शास्त्री चौकात मालट्रकने चिरडल्याने वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. संपत लक्ष्मण ठोंबरे (वय ५३) असे अपघातात म्रुत्यु झालेल्या वृद्ध पादचाऱ्याचे नाव आहे. चालक राधेश्याम प्रतापसिंह जमरा (वय २७, रा. कामठा, जिल्हा धार, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, … Read more

गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवत ‘त्यानं’ घातला 4.85 लाखांना गंडा

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । गुंतवणूकीवर जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एकाला 4 लाख 85 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी आरोपीवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा नायर (रा. हिरानंदानी पवई, मुंबई) व रजत वरबा अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अवधूत गंगाधर पुरी (रा. राजधानी कॉलनी, सातारा परिसर) यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा लपंडाव; कोयना धरणात किती पाणीसाठा?

Koyna Dam News 3

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात कोयना पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, संततधारेमुळे धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची अवाक झाली आहे. सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी कोयना धरणात आज सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 84.99 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाण्याची अवाक झाल्याने धरण 80.75 टक्के भरले आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवार … Read more

साथरोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी फलटणमध्ये 5 हजार 234 कंटेनरची तपासणी

Phalatan News 20240729 163130 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळ्यामुळे फलटण शहरात अनेक ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता फलटण नगर परिषदेच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत शहरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 5 हजार 234 कंटेनरची तपासणी करण्यात आली. फलटण शहरातील दोन हजार 871 घरांचे सर्वेक्षण आणि पाच हजार 234 कंटेनरची तपासणी करण्यात आली. … Read more

जावळी तालुक्यात साथरोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत महास्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 20240729 155200 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी साठल्याने त्याठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे. आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच प्लास्टिक कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. साथरोग नियंत्रणासाठी महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या … Read more

साताऱ्यात घरामध्ये शिरले ड्रेनेजचे पाणी; रहिवाशांवर स्थलांतर करण्याची वेळ

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यामध्ये रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढलयामुळे कण्हेर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला. रविवारी दिवस रात्रभर जोरदार सरी कोसळल्यामुले ठीक ठिकाणी रस्ते खचले, छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, साताऱ्यात समर्थ मंदिर परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी तसेच ड्रेनेज फुल्ल झाल्याने त्याचे दुर्गंधीयुक्त पाणी … Read more

वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

Wai Crime News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना अज्ञात चोरटयांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा वाई पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई येथील मुख्य … Read more

रात्रभर मुसळधार पाऊस; कोयना धरणात 84.85 TMC पाणीसाठा

Koyna News 20240729 094518 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, पूर्वेकडील महापूराची स्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सद्या कोयना धरणात 84.85 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 80.62 टक्के भरले आहे. कोयना धरणातील सहा दरवाजातून ३० हजार, तर पायथा वीजगृहाच्या दोन्ही … Read more

तरुणाला मारहाण करत ‘त्यांनी’ रोकड लुटली; पोलिस ठाण्यात 3 अनोळखींवर गुन्हा दाखल

Satara Crime News 20240729 083419 0000

सातारा प्रतिनिधी | मित्राकडून आपल्या घरी जात असताना वाटेत अडवून एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील तीन हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पोवई नाक्यावरील बीएसएनएल कार्यालयाशेजारी दि. २७ रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात 3 अनोळखींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षे शैलेंद्र जामदार (वय २२, रा. शाहूनगर, सातारा) हा … Read more

कराड विमानतळावर लॅण्डींगला धोका ठरणारी उंच टॉवरसह बांधकामे प्रशासनाकडून टार्गेटवर

Karad News 20240729 080504 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विजयनगर येथील विमानतळाला उंच बांधकाम आणि टॉवरचा धोका निर्माण झाला होता. याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत प्रशासनाकडून विमानतळ परिसरात उंच बांधकाम आणि उंच टॉवर उभारणीस प्रतिबंध करत उंच टॉवर आणि बांधकामे काढण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नुकतीच विमानळ परिसरातील टॉवरची उंची कमी करण्यात आली … Read more

स्वतः च्या गावाला जोडणारा रस्ता नीट करू न शकणाऱ्याने विकासाच्या बाता करू नये; ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडे बोल

Satara News 20240729 071350 0000

सातारा प्रतिनिधी | रत्नागिरी आणि सातारा जिह्यांना जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह साताऱ्यातील 40 गावांचा संपर्प तुटला आहे. त्यामुळेच जीव धोक्यात घालून सध्या स्थानिक या घाटातून प्रवास करत आहेत. यावरून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ‘लाडक्या बहीण भावांच्या लेकरांना असलेला धोका तुम्हाला दिसत नाही … Read more

शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा परिषद देणार पुरस्कार; ठराव समितीच्या सभेत निर्णय

Satara News 20240728 213040 0000

सातारा प्रतिनिधी | शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पुरस्कार देण्यात येत होता. आता त्यामध्ये बदल करुन सेंद्रीय शेतीमध्ये फळे, पिके, फुले, दुग्ध यामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असून त्यामध्ये अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने … Read more